कुपवाड एमआयडीसीतील बीअर बार चोरीप्रकरणी संशयितांना पोलीस कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:26 IST2021-05-23T04:26:55+5:302021-05-23T04:26:55+5:30
कुपवाड : कुपवाड एमआयडीसीतील हॉटेल प्रियांका बीअर बार व परमिट रूममध्ये आठ लाखांच्या साहित्याची चोरी केल्याबद्दल पोलिसांनी चारजणांना ...

कुपवाड एमआयडीसीतील बीअर बार चोरीप्रकरणी संशयितांना पोलीस कोठडी
कुपवाड : कुपवाड एमआयडीसीतील हॉटेल प्रियांका बीअर बार व परमिट रूममध्ये आठ लाखांच्या साहित्याची चोरी केल्याबद्दल पोलिसांनी चारजणांना अटक केली होती. त्यांना शनिवारी न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने चार दिवस पोलीस कोठडी दिली.
सांगलीतील रघुनाथसिंह छोटूसिंह राजपूत यांचे कुपवाड एमआयडीसीत हॉटेल प्रियांका बीअर बार व परमिट रूम आहे. लॉकडाऊनमुळे बीअर बार बंदच आहे. संशयित अमोल घोरपडे, सागर धनवडे, रोहित आवळे, गौतम कवटगी या चारजणांनी बीअर बारचा पाठीमागील दरवाजा उचकटून आत प्रवेश केला. त्यानी विदेशी दारू, बीअरचे बॉक्स, इलेक्ट्रॉनिक साहित्य अशा ८ लाख ७ हजार ७१४ रुपये किमतीच्या मुद्देमालाची चोरी केली होती. हे चारही अट्टल गुन्हेगार आहेत. त्यांच्याविरुद्ध कुपवाड, संजयनगर या पोलीस ठाण्यांत विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. त्यांना शनिवारी न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने चार दिवस पोलीस कोठडी दिली आहे.