कुपवाडला कामगारांनी जपलं रक्ताचं नातं!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:31 IST2021-07-14T04:31:38+5:302021-07-14T04:31:38+5:30
‘सुयश’च्या सभागृहात हे शिबिर झाले. सुयश फौंड्री, सुयश आयर्न अँड स्टील, सुयश डक्टाइल कास्टिंग या तिन्ही युनिट्समधील कामगारांनी रक्तदान ...

कुपवाडला कामगारांनी जपलं रक्ताचं नातं!
‘सुयश’च्या सभागृहात हे शिबिर झाले. सुयश फौंड्री, सुयश आयर्न अँड स्टील, सुयश डक्टाइल कास्टिंग या तिन्ही युनिट्समधील कामगारांनी रक्तदान केले. सुयश ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे डायरेक्टर गुंडू एरंडोले, मॅनेजिंग डायरेक्टर पोपटराव जगताप, जनरल मॅनेजर प्रकाश माळी, वर्क्स मॅनेजर सूरज दळवी, एचआर मॅनेजर शशिकांत सोनकर, रवींद्र पाटील यांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले.
चौकट :
संचालकांचे रक्तदान
कुपवाड एमआयडीसीतील सुयश ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे डायरेक्टर गुंडू एरंडोले, मॅनेजिंग डायरेक्टर पोपटराव जगताप यांनी स्वतः रक्तदान करून कामगारांसमोर आदर्श ठेवला.
फोटो ओळ : कुपवाड एमआयडीसीतील सुयश ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजमध्ये ‘लोकमत’च्या वतीने आयोजित रक्तदान शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी डायरेक्टर गुंडू एरंडोले, मॅनेजिंग डायरेक्टर पोपटराव जगताप, जनरल मॅनेजर प्रकाश माळी, वर्क्स मॅनेजर सूरज दळवी, एचआर मॅनेजर शशिकांत सोनकर, रवींद्र पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.