शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

कुपवाडमध्ये अट्टल चोरट्यास अटक, घरफोड्यांचा छडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2017 15:55 IST

कुपवाड शहरातील आस्की बेकरी आणि अर्जुन मोबाईल शॉपी फोडणारा अट्टल चोरटा प्रवीण प्रल्हाद भोसले (वय ३१, रा. हनुमाननगर, कुपवाड, मूळ गाव : कुंभोज, जि. कोल्हापूर) यास शनिवारी पहाटे कुपवाड पोलिसांनी अटक केली.

ठळक मुद्देमोबाईल, एलईडीसह ४० हजारांचा माल जप्तआणखी काही घरफोड्या, चोरीच्या घटना उघडकीस येण्याची शक्यता

कुपवाड : शहरातील आस्की बेकरी आणि अर्जुन मोबाईल शॉपी फोडणारा अट्टल चोरटा प्रवीण प्रल्हाद भोसले (वय ३१, रा. हनुमाननगर, कुपवाड, मूळ गाव : कुंभोज, जि. कोल्हापूर) यास शनिवारी पहाटे कुपवाड पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडील १२ मोबाईल, एलईडीसह सुमारे चाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. त्याच्यावर विश्रामबाग पोलिस ठाण्यात एक गुन्हा दाखल आहे.

शहरातील मल्लिकार्जुन शामराव लोहार यांचे अर्जुन मोबाईल शॉप हे दुकान मंगळवार, दि. १७ आॅक्टोबर रोजी मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी फोडले होते.

या दुकानातील अकरा नवीन व चार रिपेअरीसाठी आलेले मोबाईल, असा एकूण २८ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला होता. त्यानंतर पुढील आठवड्यात गुरुवार, दि. २६ आॅक्टोबर रोजी मध्यरात्रीच्या सुमारास बिरू विठ्ठल आस्की यांची आस्की बेकरी ही चोरट्याने फोडली होती. याबरोबरच शहरासह परिसरात आणखी दोन ते तीन घरफोड्या झाल्या होत्या.

या पार्श्वभूमीवर गुन्हे प्रकटीकरण शाखेचे हवालदार प्रवीण यादव, नितीन मोरे यांनी चोवीस तासाच्या आत अट्टल चोरट्यास मुद्देमालासह गजाआड केले. या चोरट्याकडून बारा मोबाईल, एलईडीसह सुमारे चाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

चोरट्यांकडून आणखी काही घरफोड्या व चोरीच्या घटना उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली. हवालदार रमेश जाधव, विश्वास वाघ अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :crimeगुन्हेPoliceपोलिस