कुंडलला अपघातात तरुण जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:22 IST2021-04-03T04:22:57+5:302021-04-03T04:22:57+5:30
सांगली : कुंडल (ता.पलूस) येथे दुचाकीवरून पडून झालेल्या अपघातात तरुण जखमी झाला. संतोष गोरे (वय २२) असे जखमीचे नाव ...

कुंडलला अपघातात तरुण जखमी
सांगली : कुंडल (ता.पलूस) येथे दुचाकीवरून पडून झालेल्या अपघातात तरुण जखमी झाला. संतोष गोरे (वय २२) असे जखमीचे नाव असून, गुरुवारी रात्री आठच्या सुमारास ही घटना घडली. त्यास उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
---
बलवडी येथील तरुण अपघातात जखमी
सांगली : बलवडी (ता. खानापूर) येथे दुचाकीवरून पडून झालेल्या अपघातात तरुण जखमी झाला. वैभव अर्जुन पवार (वय ३५) असे जखमीचे नाव असून गुरुवारी रात्री सातच्या सुमारास हा अपघात घडला. त्यास उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
---
कवलापूर येथे एकास विषबाधा
सांगली : कवलापूर (ता.मिरज) येथील तरुणास विषबाधा झाली. महेश दत्तात्रय गोंजारी (वय ३३) असे त्याचे नाव असून गुरुवारी रात्री साडेआठच्या सुमारास हा प्रकार घडला. त्यास उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
---
निमणी येथे तरुणास मारहाण
सांगली : निमणी (ता. तासगाव) येथील तरुणास चार ते पाच जणांकडून मारहाण करण्यात आली. अतुल उत्तम सावंत (वय ३१) असे जखमीचे नाव असून गुरुवारी रात्री आठच्या सुमारास हा प्रकार घडला. त्यास उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
---
सांगलीत दोघांना मारहाण
सांगली : शहरातील लक्ष्मी मंदिर परिसरात तरुणास तिघांकडून मारहाण करण्यात आली. राजाराम शामराव सोरटे (वय २६) असे जखमीचे नाव असून शुक्रवारी दुपारी तीनच्या सुमारास हा प्रकार घडला. त्यास उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
---
सावळज येथे तरुणास विषबाधा
सांगली : सावळज (ता. तासगाव) येथे तरुणास विषबाधा झाली. दिलखुष कुमार (वय २२) असे त्याचे नाव असून तो मूळचा बिहार येथील आहे. शुक्रवारी दुपारी एकच्या सुमारास हा प्रकार घडला. त्यास उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
---
सांगलीत अपघातात तरुण जखमी
सांगली : शहरातील वखारभाग परिसरात दुचाकी खांबाला धडकून झालेल्या अपघातात तरुण जखमी झाला. महेश जनार्दन ठोकळे (वय २७, रा. जुना बुधगाव रोड) असे जखमीचे नाव असून शुक्रवारी दुपारी एकच्या सुमारास हा अपघात घडला. त्यास उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
---
सांगलीत तरुणास मारहाण
सांगली : शहरातील खणभाग परिसरात तरुणास तिघांकडून मारहाण करण्यात आली. अल्ताफ हारुण शेख (वय २१, रा. बदाम चौक) असे जखमी तरुणाचे नाव असून गुरुवारी रात्री दहाच्या सुमारास हा प्रकार घडला. त्यास उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.