कुंडलला बारा तासांत पतीपाठोपाठ पत्नीचाही मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 04:25 IST2021-04-14T04:25:24+5:302021-04-14T04:25:24+5:30

फाेटाे : १३ मालन खारगे पलूस : कुंडल (ता. पलूस) येथे पतीच्या निधनानंतर अवघ्या बारा तासांत पत्नीचाही हृदयविकाराच्या धक्क्याने ...

Kundal died in twelve hours, followed by his wife | कुंडलला बारा तासांत पतीपाठोपाठ पत्नीचाही मृत्यू

कुंडलला बारा तासांत पतीपाठोपाठ पत्नीचाही मृत्यू

फाेटाे : १३ मालन खारगे

पलूस : कुंडल (ता. पलूस) येथे पतीच्या निधनानंतर अवघ्या बारा तासांत पत्नीचाही हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. चंद्रकांत नारायण खारगे (वय ८०) व मालन चंद्रकांत खारगे (वय ७०) असे या दाम्पत्याचे नाव आहे. पतीपाठोपाठ पत्नीच्या निधनाने गावात शोककळा पसरली.

कुंडल येथील चंद्रकांत खारगे हे गेल्या तीन महिन्यांपासून वृद्धापकाळाने आजारी होते. अर्धांगवायुमुळे त्यांच्या शरीराची एक बाजू निकामी झाली होती. गेल्या तीन महिन्यांपासून पत्नी मालन या त्यांची शुश्रूषा करत होत्या. अनेक वर्षांच्या संसाराच्या गाड्यात अनेक सुख-दुःखात त्यांनी पती चंद्रकांत यांना मोलाची साथ दिली. पती चंद्रकांत यांचे साेमवार, दि. १२ रोजी सायंकाळी ६ वाजता निधन झाले. हा धक्का त्या सहन करू शकल्या नाहीत. मंगळवार, दि. १२ रोजी पहाटे ३ वाजता मालन यांचाही हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू झाला. पतीपाठोपाठ पत्नीच्या मृत्यूने कुंडलमध्ये शोककळा पसरली. त्यांच्या पश्चात मुलगा विवेकानंद, दोन मुली, सून, नातवंडे असा परिवार आहे.

Web Title: Kundal died in twelve hours, followed by his wife