विटा वारकरी मंडळाचे कुमार शितोळे अध्यक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:27 IST2021-01-08T05:27:52+5:302021-01-08T05:27:52+5:30

विटा : अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या विटा शहर अध्यक्षपदी कुमार शितोळे यांची तर उपाध्यक्षपदी मनोहर सावंत यांची निवड करण्यात ...

Kumar Shitole President of Vita Warkari Mandal | विटा वारकरी मंडळाचे कुमार शितोळे अध्यक्ष

विटा वारकरी मंडळाचे कुमार शितोळे अध्यक्ष

विटा : अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या विटा शहर अध्यक्षपदी कुमार शितोळे यांची तर उपाध्यक्षपदी मनोहर सावंत यांची निवड करण्यात आली. यावेळी कोषाध्यक्षपदी सदाशिव शितोळे व सचिवपदावर साहेबराव साळुंखे यांची वर्णी लागली आहे.

अखिल भारतीय वारकरी मंडळाची विटा शहर कार्यकारी जिल्हाध्यक्ष विकास उर्फ नंदू महाराज आणि खानापूर तालुकाध्यक्ष अमितकुमार रावताळे यांच्या उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीत विटा शहर कार्यकारिणीची निवड करण्यात आली. नूतन पदाधिकाऱ्यांना जिल्हाध्यक्ष नंदू महाराज यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. यानंतर माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांच्या हस्ते नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी विटा शहरात सांगली जिल्ह्यातील पहिले वारकरी भवन उभारण्यात येईल, अशी ग्वाही माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी दिली. या कार्यक्रमास राजेंद्र शितोळे, भानुदास लोटके, शिवाजी शितोळे, शहाजी भोसले, आनंदराव कदम, अशोक फडतरे, मंडले मामा, साहेबराव जाधव, शंकर दळवी, आबा सुतार, संजय झाडे, सोहम जाधव, सुधाकर निकम, सुनील वरूडे, सुरेश फासे, सुवर्णा शितोळे, सुवर्णा जाधव, कृष्णा भिंगारदेवे, प्रताप कदम यांच्यासह वारकरी मंडळी उपस्थित होते.

फोटो : ०६०१२०२१-कुमार शितोळे, विटा (अध्यक्ष)

फोटो : ०६०१२०२१-विटा-मनोहर सावंत, विटा (उपाध्यक्ष)

Web Title: Kumar Shitole President of Vita Warkari Mandal