शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र-कर्नाटकला जोडणारा कुडची पूल पाण्याखाली, 'या' मार्गे वाहतूक सुरु

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2022 14:05 IST

कृष्णेत पाण्याचा प्रवाह मोठा असल्याने पूल रिकामा होण्यास किमान आठवडा लागण्याची शक्यता.

सांगली : महाराष्ट्र आणि कर्नाटकला जोडणारा कुडची (ता. रायबाग) पूल पाण्याखाली गेला आहे. कर्नाटकात जाण्यासाठी अंकली किंवा अथणी मार्गाचा वापर करावा लागत आहे. कृष्णा नदीचे पाणी कुडची पुलावरुन सुमारे चार फूट उंचीने वाहत आहे. सध्या हा मार्ग वाहतुकीसाठी पूर्णत: बंद झाला आहे.सांगली-मिरजेतून जमखंडी, रायबाग, मायाक्का चिंचली, हारुगिरी, रबकवी, बनहट्टी आदी भागात जाण्यासाठी पर्यायी मार्गाचा वापर करावा लागत आहे. मिरजेतून जमखंडी, रायबागला जाण्यासाठी कागवाड, अंकलीमार्गे प्रवास करावा लागत आहे. त्याशिवाय मंगसुळी, अथणीमार्गेही वाहने जात आहेत. मायाक्का चिंचलीला देवदर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांचा रस्ता मात्र बंद झाला आहे.कृष्णेत पाण्याचा प्रवाह मोठा असल्याने पूल रिकामा होण्यास किमान आठवडा लागण्याची शक्यता आहे. यादरम्यान पाऊस वाढला, तर मात्र रस्ता बंदच राहील. नवा पर्यायी उंच पूल उभारण्याचे काम मंद गतीने सुरु आहे.

टॅग्स :SangliसांगलीWaterपाणी