कुचीच्या सहाजणांवर अट्राॅसिटीचा गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:57 IST2021-09-02T04:57:00+5:302021-09-02T04:57:00+5:30
कवठेमहांकाळ : आगळगाव, ता. कवठेमहांकाळ येथील शेतातील दलित कुटुंबाचे घर पाडले आहे. या प्रकरणी व त्यांना जातिवाचक शिवीगाळ देऊन ...

कुचीच्या सहाजणांवर अट्राॅसिटीचा गुन्हा दाखल
कवठेमहांकाळ : आगळगाव, ता. कवठेमहांकाळ येथील शेतातील दलित कुटुंबाचे घर पाडले आहे. या प्रकरणी व त्यांना जातिवाचक शिवीगाळ देऊन धमकावल्याप्रकरणी कवठेमहांकाळ पोलिसांनी कुची येथील विजय माळी व अनोळखी पाच व्यक्तींवर अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्यानुसार अट्राॅसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मंगल नामदेव कांबळे (वय ४८) यांनी कवठेमहांकाळ पोलिसांत फिर्याद दिली आहे. या फिर्यादीनुसार कवठेमहांकाळचे पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांनी हा अट्राॅसिटीचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी जत विभागीय पोलीस अधिकारी रत्नाकर नवले यांनी भेट देऊन माहिती घेतली.
या फिर्यादीमध्ये म्हटले आहे की, कुची येथील विजय माळी आणि त्यांच्या पाच साथीदारांनी दि. ८ ऑगस्ट रोजी सायंकाळी आगळगाव येथील शेतात असणारे आमचे घर जेसीबीने पाडले. पुन्हा दि. २० ऑगस्ट रोजी मी व माझे पती नामदेव कांबळे दुपारी दोन वाजता घर बांधण्यासाठी पत्रे घेऊन गेलो असता विजय माळी यांनी या ठिकाणी काय करायचे नाही, नाहीतर तुमचे गुडघे मोडून गळ्यात देईन, अशी धमकी दिली. आम्ही दलित कुटुंबातील असून, विजय माळी यांच्यापासून आमच्या कुटुंबाला धोका आहे, असे या फिर्यादीत म्हटले आहे.
अखेर कवठेमहांकाळ पोलिसांनी मंगळवारी विजय माळी आणि त्यांच्या अनोळखी पाच साथीदारांविरुद्ध अट्राॅसिटीचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास जत विभागीय पोलीस अधिकारी रत्नाकर नवले करीत आहेत.