मिरजेतील कुस्ती मैदानात कुबेरसिंग रजपूत विजयी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:42 IST2021-02-23T04:42:23+5:302021-02-23T04:42:23+5:30
मिरज : पालकमंत्री जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मिरजेत अशोकसिंग रजपूत मित्र परिवारातर्फे निकाली कुस्त्यांचे मैदान पार ...

मिरजेतील कुस्ती मैदानात कुबेरसिंग रजपूत विजयी
मिरज : पालकमंत्री जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मिरजेत अशोकसिंग रजपूत मित्र परिवारातर्फे निकाली कुस्त्यांचे मैदान पार पडले. मैदानात प्रथम क्रमांकाची कुस्ती कुबेरसिंग राजपूत याने जिंकली.
मोहनराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष मनोज शिंदे व शहर जिल्हा कॉंग्रेस अध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्या हस्ते मैदानाचे पूजन करण्यात आले. अनेक युवा पैलवानांनी दर्जेदार कुस्त्या करून मैदानात रंगत आणली. कुस्ती मैदानात सांगली जिल्ह्यातून ५२ पैलवान सहभागी होते. प्रथम क्रमांकाची कुस्ती कुबेरसिंग राजपूत, द्वितीय क्रमांकाची कुस्ती गणेश पाटील यांनी जिंकली. याशिवाय राणा राजपूत व सौरभ पाटील यांची कुस्ती प्रेक्षणीय झाली. चटकदार कुस्ती समर्थ केसरे याने जिंकली. यावेळी तुकाराम घोरपडे, विशालसिंग राजपूत, किरणसिंग राजपूत, अजितराव घोरपडे, सुखदेव केसरे, देवेंद्र केसरे व वस्ताद मलगोंडा पाटील उपस्थित होते. कॉंग्रेसचे ओबीसी जिल्हाध्यक्ष अशोकसिंग राजपूत व अमितसिंग राजपूत यांनी संयोजन केले.