‘कृष्णा’ची आज ऑनलाईन वार्षिक सभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:25 IST2021-03-26T04:25:12+5:302021-03-26T04:25:12+5:30

शिरटे : रेठरे बुद्रुक (ता. कऱ्हाड) येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याची २०१९-२० या आर्थिक वर्षाच्या अधिमंडळाची वार्षिक ...

Krishna's online annual meeting today | ‘कृष्णा’ची आज ऑनलाईन वार्षिक सभा

‘कृष्णा’ची आज ऑनलाईन वार्षिक सभा

शिरटे : रेठरे बुद्रुक (ता. कऱ्हाड) येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याची २०१९-२० या आर्थिक वर्षाच्या अधिमंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा आज, शुक्रवारी दुपारी एक वाजता कारखान्याच्या कार्यस्थळावरून ऑनलाईन पद्धतीने आयोजित करण्यात आली असल्याची माहिती कार्यकारी संचालक सूर्यकांत दळवी यांनी दिली.

सूर्यकांत दळवी म्हणाले, कोरोनामुळे महाराष्ट्र शासन सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाच्या ८ मार्चच्या परिपत्रकानुसार वार्षिक सर्वसाधारण सभा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे. ही सभा कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासकीय नियमांचे पालन करून व मर्यादित व्यक्तींच्या उपस्थितीत सर्व सहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा ऑनलाईन पद्धतीने सुरू आहेत. कृष्णा कारखान्याची वार्षिक सभाही ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे. त्यामुळे सभासदांनी प्रत्यक्ष उपस्थित न राहता, कारखान्याकडे नोंदणी केलेल्या सभासदांनी कारखान्याच्या वतीने पुरविण्यात येणाऱ्या लिंकद्वारे सभेस ऑनलाईन पद्धतीने सहभागी होऊन, प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: Krishna's online annual meeting today