साखर कारखानदारीत ‘कृष्णा’चा कारभार आदर्श

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:25 IST2021-05-16T04:25:03+5:302021-05-16T04:25:03+5:30

रेठरे बुद्रुक (ता. कराड) येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या सन २०२१-२२ या गळीत हंगामाकरिता ऊसतोडणी वाहतूक करारांचा ...

Krishna's management is ideal in the sugar industry | साखर कारखानदारीत ‘कृष्णा’चा कारभार आदर्श

साखर कारखानदारीत ‘कृष्णा’चा कारभार आदर्श

रेठरे बुद्रुक (ता. कराड) येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या सन २०२१-२२ या गळीत हंगामाकरिता ऊसतोडणी वाहतूक करारांचा प्रारंभ कारखान्याचे संचालक धोंडिराम जाधव यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी संचालक दिलीपराव पाटील, ब्रीजराज मोहिते, सुजित मोरे, पांडुरंग होनमाने, गिरीष पाटील, प्रमोद पाटील, मनोज पाटील, प्रकाश देसाई यांची प्रमुख उपस्थिती होती.

सचिव मुकेश पवार यांनी स्वागत केले. यावेळी मुख्य शेती अधिकारी प्रकाश सूर्यवंशी, ऊसविकास अधिकारी पंकज पाटील, सहायक ऊसविकास अधिकारी शिवाजी बाबर, केनयार्ड सुपरवायझर विजय मोहिते, लेबर ॲँड वेल्फेअर ऑफिसर अरुण पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉ. हर्षल निकम आदींसह ऊसतोडणी वाहतूकदार व कंत्राटदार उपस्थित होते. संचालक पांडुरंग होनमाने यांनी आभार मानले.

फोटो : १५ शिरटे १

ओळी : रेठरे बुद्रुक (ता. कराड) येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्यावर ऊसतोडणी वाहतूक करारांचा प्रारंभ धोंडिराम जाधव यांच्याहस्ते करण्यात आला. यावेळी प्रकाश सूर्यवंशी, मनोज पाटील, दिलीप पाटील, प्रकाश देसाई, ब्रीजराज मोहिते, सुजित मोरे उपस्थित होते.

Web Title: Krishna's management is ideal in the sugar industry