मगरींच्या बंदोबस्तासाठी वन विभागाची कृष्णाकाठी पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:28 IST2021-05-13T04:28:21+5:302021-05-13T04:28:21+5:30
चोपडेवाडी (ता. पलूस) येथील नम्रता मारुती मोरे या महिलेवर ७ मे रोजी मगरीने हल्ला केला; परंतु प्रसंगावधानामुळे मगरीच्या ...

मगरींच्या बंदोबस्तासाठी वन विभागाची कृष्णाकाठी पाहणी
चोपडेवाडी (ता. पलूस) येथील नम्रता मारुती मोरे या महिलेवर ७ मे रोजी मगरीने हल्ला केला; परंतु प्रसंगावधानामुळे मगरीच्या तावडीतून सुटका होऊन त्यांचे प्राण वाचले. या घटनेची माहिती संग्राम देशमुख यांना
कळताच त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून घटनेची कल्पना दिली.
यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने पलूस व कडेगाव तालुक्यातील वनविभागाला सूचना देऊन पाहणी करावयास सांगितले.
यानुसार पलूस तालुका वनविभागाचे परिमंडल अधिकारी मारुती ढेरे, क्षेत्र अधिकारी शहाजी ढेरे यांनी कृष्णा नदीकाठच्या आमणापूर, धनगाव, अंकलखोप, भिलवडी, चोपडेवाडी, ब्रह्मणाळ आदी गावांना भेट दिली. आमणापूर येथील कोंडार परिसरात मगरींचा मुक्तसंचार दिसून आला. काळ्या ओढ्यालगत भीमराव घाडगे यांच्या मळीत १४ फूट लांबीच्या मगरीने अंडी घालण्यासाठी जागा केली असल्याचे दिसून आले.
चाैकट
दोन महिने काळजी घ्या
शक्यतो मे व जून या दोन महिन्यांत विणीच्या हंगामात मगरीच्या हद्दीत कोणीही आले तर मगर आक्रमक होते. या दोन महिन्यांव्यतिरिक्त मगर शांत दिसतात. कृष्णा नदी ही मगरींच्या नैसर्गिक अधिवासासाठी योग्य आहे. नागरिकांच्या मागणीनुसार सर्वच मगरी पकडून त्यांना दुसरीकडे सोडणे शक्य नसल्याने नागरिकांनी दोन महिने दक्षता घ्यावी, असे वनविभागाने स्पष्ट केले आहे.