शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

टिकटॉकवर व्हिडीओ अपलोड करताना बहेत तरुण गेला वाहून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 15:29 IST

बहे (ता. वाळवा) येथील कृष्णा नदीवरील पुलाच्या पश्चिमेस असलेल्या बोटीच्या धक्क्यावरुन सूर मारल्यानंतर १८ वर्षांचा तरुण नदीतील पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याची घटना घडली. हा प्रकार रविवारी दुपारी ३ च्या सुमारास घडला.

ठळक मुद्देबहेत कृष्णा पात्रात तरुण गेला वाहूनटिकटॉकवर व्हिडीओ अपलोड करताना प्रकार

इस्लामपूर : बहे (ता. वाळवा) येथील कृष्णा नदीवरील पुलाच्या पश्चिमेस असलेल्या बोटीच्या धक्क्यावरुन सूर मारल्यानंतर १८ वर्षांचा तरुण नदीतील पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याची घटना घडली. हा प्रकार रविवारी दुपारी ३ च्या सुमारास घडला.

सायंकाळी ७ वाजेपर्यंत तरी त्याचा शोध लागला नव्हता. सोशल मीडियावर फेसबुक आणि टिकटॉकवर टाकण्यासाठी साहसी व्हिडीओ बनवायला गेलेल्या या युवकावर स्वत:च पाण्यातून वाहून जाण्याची वेळ आली.प्रतीक पोपट आवटे (वय १८, मूळ रा. आमणापूर, ता. पलूस, सध्या यल्लम्मा चौक इस्लामपूर) असे पाण्यात वाहून गेलेल्या युवकाचे नाव आहे. तो येथील आपल्या मामाकडे वास्तव्यास होता. फेसबुक आणि टिकटॉकवर व्हिडीओ अपलोड करण्याची प्रतीकसह त्याच्या काही मित्रांना आवड होती. सुटीदिवशी हे चार—पाच मित्र वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन आपले व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर अपलोड करत होते.रविवारी दुपारी प्रतीक हा आपल्या काही मित्रांसह बहे येथील कृष्णा नदी परिसरात गेला होता. पुलाच्या पश्चिमेला नदीपात्रातच बोटिंग क्लबसाठी सिमेंटचा चबुतरावजा धक्का तयार करण्यात आला आहे. त्याच्यापुढेच बंधारा आहे. सध्या नदीपात्रात पाण्याचा वेग मोठा आहे. बंधाऱ्याजवळ तर हा वेग जोराचा होता.प्रतीकने या धक्क्यावरुन पाण्यात सूर मारल्यानंतर तो काही वेळ वर आलाच नाही. त्यामुळे त्याचे मित्र घाबरुन गेले. ५ ते १0 मिनिटांचा कालावधी झाल्यानंतरही प्रतीक वर न आल्याने त्यांनी आरडाओरडा करत मदतीसाठी ग्रामस्थांना बोलावले. मात्र प्रतीकचा शोध लागला नाही.या घटनेची माहिती पोलिसांना कळाल्यावर पोलीस निरीक्षक नारायण देशमुख, पोलीस उपनिरीक्षक समाधान लवटे व इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत ग्रामस्थांच्या मदतीने शोधकार्याला सुरुवात केली. कृष्णा नदीपात्रातील रामलिंग बेटाच्या उत्तर बाजूने जाणाºया पाण्याच्या वेगवान प्रवाहातून प्रतीक वाहून गेल्याचे काहींनी पाहिले. पोलिसांनी त्या बाजूने शोधमोहीम राबवली. मात्र सायंकाळी ७ वाजेपर्यंत तो सापडला नाही. अंधार पडू लागल्याने पोलिसांनी शोधकार्य थांबवले. सोमवारी सकाळी जीवरक्षक दलाच्या मदतीने पुन्हा प्रतीकचा शोध घेणार असल्याचे पोलीस निरीक्षक देशमुख यांनी सांगितले.

टॅग्स :Social Mediaसोशल मीडियाSangliसांगली