कृष्णा घाटावर लखलखाट...
By Admin | Updated: November 15, 2016 23:48 IST2016-11-15T23:48:08+5:302016-11-15T23:48:08+5:30
भिलवडीत दीपोत्सव : वसंतदादा जन्मशताब्दी सोहळ्यानिमित्त उपक्रम

कृष्णा घाटावर लखलखाट...
भिलवडी : भिलवडी (ता. पलूस) येथील ऐतिहासिक कृष्णा घाटावर दीपोत्सव साजरा करण्यात आला. लक्ष-लक्ष ज्योतींनी उजळलेला कृष्णाघाट पाहण्यासाठी भिलवडी व परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती.
सहकारमहर्षी पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील यांच्या जन्मशताब्दीनिमित्त भिलवडीतील सर्वपक्षीय कार्यकर्ते व नागरिकांच्यावतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते वसंतदादांचे सहकारी आनंदराव मोहिते व माजी जिल्हा परिषद सदस्य संग्राम पाटील यांच्याहस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी आनंदराव मोहिते, सुभाष कवडे, संजय पाटील यांनी वसंतदादांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.
शितोळ ठाणे उद्ध्वस्त करून मराठा सैन्याने दगड बैलगाडीतून आणून भिलवडी येथे भव्य, विस्तीर्ण व वास्तुशास्त्राचा उत्कृष्ट नमुना असणारा घाट व गावाभोवती वेस बांधली. हा घाट मराठी राज्यसत्तेच्या ऐतिहासिक विजयाचे प्रतीक म्हणून परिचित आहे. चॅलेंजर्स ग्रुप व कुडो कराटे असोसिएशनच्या सर्व शिबिरार्थी विद्यार्थ्यांनी दीपोत्सवाचे नियोजन केले होते. शेकडो दिव्यांनी भिलवडीचा ऐतिहासिक कृष्णाघाट उजळून गेला होता. यावेळी दक्षिण भाग भिलवडी विकास सोसायटीचे अध्यक्ष राजेंद्र पाटील, माजी सरपंच शहाजी गुरव, विलास पाटील, बाबासाहेब मोहिते, चंद्रकांत पाटील, अधिकराव पाटील, दीपक पाटील, बाळासाहेब मोहिते, रमेश पाटील, सुधीर सावंत, बाळासाहेब मोरे, पांडुरंग टकले, प्रकाश चौगुले, मोहन तावदर आदी उपस्थित होते. (वार्ताहर)