‘क्रांती’तर्फे ऊस उत्पादन वाढीसाठी योजना : लाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:18 IST2021-06-10T04:18:49+5:302021-06-10T04:18:49+5:30
कारखान्यामार्फत दरवर्षी ऊस विकास योजनेतून बियाणे, ऊस रोपे, रासायनिक खते, तसेच मजूर कामासाठी रोखीचे अर्थसाहाय्य, अशा अनेक सोयीसुविधा पुरवठा ...

‘क्रांती’तर्फे ऊस उत्पादन वाढीसाठी योजना : लाड
कारखान्यामार्फत दरवर्षी ऊस विकास योजनेतून बियाणे, ऊस रोपे, रासायनिक खते, तसेच मजूर कामासाठी रोखीचे अर्थसाहाय्य, अशा अनेक सोयीसुविधा पुरवठा केल्या जातात. या योजना सातत्याने राबविल्याने कारखान्याचे सरासरी एकरी उत्पादन ४५ मे. टनांवर पोहोचले आहे. या हंगामात जमीन सुपीकता वाढविण्यासाठी कारखान्याने विशेष कार्यक्रम हाती घेतला आहे. यामध्ये ७५ टक्के अनुदानावर हिरवळीच्या खतांसाठी बियाणे पुरवठा करण्यात येणार आहेत. ऊस लागणीपूर्व ताग, धेंच्या माडे पेरून अथवा लागणीमध्ये आंतरपीक म्हणून घेतल्यास पात्र शेतकऱ्यांना अनुदानाचा लाभ होणार आहे. यासाठी करखान्यामार्फत २० रुपये प्रति किलो नाममात्र दराने बियाणे उपलब्ध करून दिले जाते. या योजनेतून शेतकऱ्यांना दोन हजार रुपये अनुदान म्हणून मिळणार आहेत. शेतकऱ्यांनी अधिक उत्पादन घेण्याबरोबरच आपल्या जमिनीची सुपीकता व आरोग्य राखण्यासाठी कारखान्यांच्या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.