क्रांती कारखान्यातर्फे ऊस रोप विक्री प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:21 IST2021-07-17T04:21:19+5:302021-07-17T04:21:19+5:30

पलूस : ऊस लागणीसाठी रोपांचा वापर केल्यामुळे एकरी उत्पादनात ८ ते १० मेट्रिक टनाची वाढ होते. क्रांती कारखान्यामार्फत ४२ ...

Kranti factory starts selling sugarcane seedlings | क्रांती कारखान्यातर्फे ऊस रोप विक्री प्रारंभ

क्रांती कारखान्यातर्फे ऊस रोप विक्री प्रारंभ

पलूस : ऊस लागणीसाठी रोपांचा वापर केल्यामुळे एकरी उत्पादनात ८ ते १० मेट्रिक टनाची वाढ होते. क्रांती कारखान्यामार्फत ४२ कपाच्या प्लास्टिक ट्रेमधील ऊसरोपे तयार करून शेतकऱ्यांना लागणीसाठी व तुटाळी सांधण्यासाठी पुरवठा केली जातात, अशी माहिती क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड साखर कारखान्याचे अध्यक्ष आमदार अरूणअण्णा लाड यांनी दिली. ते कारखाना नर्सरीमध्ये तयार केलेल्या ऊसरोपे विक्री शुभारंभप्रसंगी बोलत होते.

ते म्हणाले, ‘क्रांतीमार्फत एकरी ऊस उत्पादन वाढीसाठी यावर्षी विविध ऊसविकास योजना राबविल्या जाणार आहेत. रोपांचा दर २.३० पैसे प्रतिरोप आहे. याचा सर्व शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी कारखान्याचे संचालक संदीप पवार, कार्यकारी संचालक चंद्रकांत गव्हाणे, सचिव आप्पासाहेब कोरे, पर्चेस ऑफिसर शरद फाटक, प्रदीप पाटील, प्रवीण जाधव, सखाराम पवार, सचिन कदम, सुनील पाटील, पंकज भोसले, नवनाथ जाधव उपस्थित होते.

160721\20210716_104149.jpg

क्रांती ऊस रोप विक्री शुभारंभ बातमी

Web Title: Kranti factory starts selling sugarcane seedlings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.