शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

दिवसा धावणाऱ्या कोयना एक्स्प्रेसला चक्क स्लीपर डबे!, प्रवाशांना भुर्दंड; सीटिंग डबे वाढविण्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2022 12:57 IST

बसून प्रवासाचे आरक्षण न मिळालेल्या प्रवाशांना नाईलाजाने स्लीपर डब्यातून महागडा प्रवास करावा लागत आहे

सांगली : कोरोना काळानंतर रेल्वे प्रशासन प्रवाशांची कोंडी करणारे अनेक निर्णय घेत आहे. मुलांचे अर्धे तिकीट रद्द करणे, ज्येष्ठ नागरिकांना सवलत नाकारणे अशा निर्णयांनी रेल्वेची टोकाची व्यावसायिक वृत्ती स्पष्ट होत आहे. असाच एक निर्णय प्रवाशांच्या टीकेचा धनी होऊ लागला आहे. कोल्हापूर ते मुंबईदरम्यान दिवसा धावणाऱ्या कोयना एक्स्प्रेसला चक्क स्लीपरचे डबे जोडले आहेत. त्याऐवजी सीटिंग डब्यांची संख्या वाढविण्याची मागणी होत आहे.सोळा डब्यांच्या कोयनेला सध्या दोन वातानुकूलित चेअरकार, एक थ्री टायर वातानुकूलित आणि एक स्लीपर डबा जोडण्यात येत आहे. कोल्हापूर, सांगलीतून मुंबईला दिवसा धावणारी ही एकमेव एक्स्प्रेस आहे, त्यामुळे प्रवाशांची गर्दी असते. आरक्षण सातत्याने वेटिंग असते. या स्थितीत आरक्षित डबे वाढविण्याऐवजी स्लीपर आणि वातानुकूलित डबे जोडण्यात आले आहेत. बसून प्रवासाचे आरक्षण न मिळालेल्या प्रवाशांना नाईलाजाने स्लीपर डब्यातून महागडा प्रवास करावा लागत आहे. रेल्वेच्या नियमानुसार पहाटे सहा ते रात्री दहादरम्यान स्लीपर बोगीत झोपून प्रवास करता येत नाही. कोयना एक्स्प्रेसमध्ये मात्र झोपून प्रवासासाठी रेल्वेनेच उत्तेजन दिले आहे.कोल्हापूर ते मुंबईदरम्यानचा बारा तासांचा प्रवास बसून करणे शक्य नसलेल्या ज्येष्ठांसाठी ही सोय चांगली आहे, पण त्याऐवजी सीटिंगचे आरक्षित डबे वाढविले असते, तर प्रवाशांची सोय झाली असती अशा प्रतिक्रिया आहेत. मिरज ते पुणेदरम्यान वातानुकूलित चेअरकारचे तिकीट तब्बल ४२० रुपये आहे, त्यामुळे हे डबेही सध्या रिकामेच धावत आहेत.गदग कनेक्शनमुळे स्लीपर डबेकोल्हापुरातून मुंबईला रात्री पोहोचलेली कोयना एक्सप्रेस रात्री मुंबई - गदग एक्सप्रेस म्हणून सुटते. गदगच्या सोयीसाठी कोयनेला स्लीपर व वातानुकूलित डबे दिवसभर नाहक वाहून न्यावे लागत आहेत.

रेल्वे प्रशासनाने कोयना एक्स्प्रेसवर निरर्थक प्रयोग करण्याऐवजी सीटिंगचे डबे वाढवून प्रवाशांची सोय करावी. स्लीपर आणि वातानुकूलित डबे काढून त्याठकाणी आरक्षित डबे जोडावेत. - उमेश शहा, सांगली रेल डेव्हलपमेन्ट ग्रुप

टॅग्स :Sangliसांगलीrailwayरेल्वे