कुपवाडला कोविड लसीकरण केंद्र सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:27 IST2021-03-05T04:27:11+5:302021-03-05T04:27:11+5:30

कुपवाड : कोविड लसीकरणासाठी कुपवाडमध्ये केंद्र सुरू करण्याची मागणी शहर संघर्ष समितीने आयुक्तांकडे केली होती. तिची दखल घेऊन महापौर ...

Kovid vaccination center started in Kupwad | कुपवाडला कोविड लसीकरण केंद्र सुरू

कुपवाडला कोविड लसीकरण केंद्र सुरू

कुपवाड : कोविड लसीकरणासाठी कुपवाडमध्ये केंद्र सुरू करण्याची मागणी शहर संघर्ष समितीने आयुक्तांकडे केली होती. तिची दखल घेऊन महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी आरोग्यधिकारी चंद्रकांत आंबोळे यांना केंद्र सुरू करण्याची सूचना दिल्यानंतर गुरुवारी ज्येष्ठ नागरिकांना मोफत कोरोना लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले.

कोविड लस केंद्राची महापौर सूर्यवंशी, नगरसेविका वहिदा नायकवडी, उपायुक्त स्मृती पाटील यांच्यासोबत कुपवाड शहर संघर्ष समितीचे पदाधिकारी यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. शहरातील ॲलोपॅथिक रुग्णालयात ज्येष्ठ नागरिकांना मोफत कोरोना लसीचे केंद्र सुरू करण्यात आले आहे.

यावेळी संघर्ष समितीचे अध्यक्ष सनी धोतरे, कार्याध्यक्ष अनिल कवठेकर, उपाध्यक्ष संतोष माने, प्रवीण कोकरे, खजिनदार प्रकाश व्हनकडे, संचालक महावीर खोत, समीर मुजावर, महेश निर्मळे, श्रीकृष्ण कोकरे, सुनील भोसले उपस्थित होते.

Web Title: Kovid vaccination center started in Kupwad