जतच्या क्रिकेट स्पर्धेत कोल्हापूरचा कर्मवीर क्लब विजेता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:26 IST2021-02-10T04:26:19+5:302021-02-10T04:26:19+5:30
जत : आमदार विक्रम सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त येथे आयोजित टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धेत कोल्हापूरचा कर्मवीर क्रिकेट क्लब विजेता ठरला. आमदार ...

जतच्या क्रिकेट स्पर्धेत कोल्हापूरचा कर्मवीर क्लब विजेता
जत : आमदार विक्रम सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त येथे आयोजित टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धेत कोल्हापूरचा कर्मवीर क्रिकेट क्लब विजेता ठरला. आमदार सावंत यांच्या हस्ते त्यांना बक्षीस देण्यात आले.
द्वितीय क्रमांक कवठेमहांकाळच्या विश्वजित कदम फाउण्डेशनला, तृतीय क्रमांक आवंढी (ता. जत) येथील बाबासाहेब (तात्या) कोडग युथ फाउण्डेशनला, तर चौथा क्रमांक सोन्याळ (ता. जत) येथील सोन्याळ क्रिकेट क्लबला मिळाला. आमदार चषक क्रिकेट स्पर्धेत तीस संघ सहभागी झाले होते. सर्वोत्कृष्ट संघनायक म्हणून आवंढी संघाचा कर्णधार सचिन कोडग यास पारितोषिक देण्यात आले. मनोहर कोडग यांनी आवंढी संघाला चांगली कामगिरी केल्याबद्दल पाच हजार रुपयांचे बक्षीस दिले.
सोबत फोटो मेल केला आहे.