शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीच्या सुमधूर द्राक्षांची कोल्हापुरकरांना भूरळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2021 14:20 IST

grape fruits kolhpaur- सांगलीच्या उच्च प्रतीच्या टपोऱ्या, रसरशीत, सुमधूर द्राक्षांची कोल्हापूरकरांनाही भुरळ पडली. महोत्सवाच्या निमित्ताने शाहू स्मारकमध्ये खरेदीसाठी अक्षरश: उड्या पडल्या होत्या. माल संपेल तसा परत मागवून आणण्याची वेळ आली. दोनच दिवसात १२ टन द्राक्षांची विक्री झाली. ग्राहकांचा प्रतिसाद पाहून विक्रेत्यांच्याही चेहऱ्यावर हास्य फुलले.

ठळक मुद्दे शाहू स्मारकमधील द्राक्ष महोत्साला उदंड प्रतिसाददोन दिवसात तब्बल १२ टन द्राक्षांची विक्री

कोल्हापूर: सांगलीच्या उच्च प्रतीच्या टपोऱ्या, रसरशीत, सुमधूर द्राक्षांची कोल्हापूरकरांनाही भुरळ पडली. महोत्सवाच्या निमित्ताने शाहू स्मारकमध्ये खरेदीसाठी अक्षरश: उड्या पडल्या होत्या. माल संपेल तसा परत मागवून आणण्याची वेळ आली. दोनच दिवसात १२ टन द्राक्षांची विक्री झाली. ग्राहकांचा प्रतिसाद पाहून विक्रेत्यांच्याही चेहऱ्यावर हास्य फुलले.उत्पादक ते ग्राहक अशी साखळी जोडण्यासाठी म्हणून महाराष्ट्र राज्य पणन मंडळ आणि सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे कोल्हापुरात पहिल्यांदाच दसरा चौकातील शाहू स्मारकामध्ये द्राक्ष महोत्सव भरविण्यात आला आहे. सोनी (ता. मिरज) येथील दहा द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची द्राक्षे येथे विक्रीसाठी ठेवण्यात आली आहेत. मंगळवार (दि. ३०)पर्यंत चालणाऱ्या या महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी कोल्हापूरकरांनी तुफान प्रतिसाद दिला. शुक्रवारी उद्घाटनाच्या दिवशी चार टन द्राक्षांची विक्री झाली.सकाळपासून ग्राहकांनी गर्दी करण्यास सुरुवात केली. दुपारी सर्व माल संपल्यानंतर लागलीच विक्रेत्यांनी आणखी माल मागवून घेतला. अनुष्का, सुपर सोनाक्का, माणीकचमण, रेडग्लोब, कृष्णा, जम्मो सिडलेस या जातींच्या द्राक्षांची चव चाखायला मिळत असल्याने आणि ग्राहकांच्या आग्रहास्तव दरही कमी केल्याने खरेदीसाठी गर्दी वाढली. एकाच दिवसात आठ टनाहून अधिक माल संपला. 

मागील आठवड्यात गोव्यात झालेल्या महोत्सवापेक्षा जास्त प्रतिसाद कोल्हापुरात मिळत आहे. विक्रीही चांगली झाल्याने येथे आल्याचे समाधान वाटत आहे. अशाप्रकारे महोत्सव भरवल्याने उत्पादकांना चार पैसे चांगले मिळतात.विजय पाटील,द्राक्ष उत्पादक, सोनी, ता. मिरज, जि. सांगली

टॅग्स :fruitsफळेkolhapurकोल्हापूरSangliसांगली