कोल्हापूर-गोंदिया महाराष्ट्र एक्स्प्रेस रिवापर्यंत धावणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:18 IST2021-06-11T04:18:08+5:302021-06-11T04:18:08+5:30
मिरज : कोल्हापूर ते गोंदिया महाराष्ट्र एक्स्प्रेसच्या विस्तार करण्यात येणार असून इतवारी ते रिवा एक्स्प्रेस महाराष्ट्र ...

कोल्हापूर-गोंदिया महाराष्ट्र एक्स्प्रेस रिवापर्यंत धावणार
मिरज : कोल्हापूर ते गोंदिया महाराष्ट्र एक्स्प्रेसच्या विस्तार करण्यात येणार असून इतवारी ते रिवा एक्स्प्रेस महाराष्ट्र एक्स्प्रेसमध्ये विलीन करून कोल्हापूर ते गोंदिया एक्स्प्रेस रिवापर्यंत धावणार आहे. मध्य रेल्वेच्या या प्रस्तावास मंजुरी मिळाली आहे. जुलैपासून कोल्हापूर ते रिवा महाराष्ट्र एक्स्प्रेस सुरू होणार आहे. आठवड्यातून तीन दिवस कोल्हापूर गोंदिया दैनिक महाराष्ट्र एक्स्प्रेस असून मध्य रेल्वेकडून चालविण्यात येत आहे.
पश्चिम मध्य रेल्वेची रिवा-इतवारी-रिवा एक्स्प्रेस आठवड्यातून तीन दिवस नागपुरातून धावते. रेल्वे बोर्डाने दैनंदिन महाराष्ट्र एक्स्प्रेसचा विस्तार करून रिवापर्यत दैनंदिन एक्स्प्रेस सुरू करण्यास मंजुरी दिली आहे. यामुळे रिवा-इतवारी एक्स्प्रेस महाराष्ट्र एक्स्प्रेसमध्ये विलीन झाल्याने रेवा व नागपूरदरम्यान दररोज सेवा सुरू होईल. विस्तार करण्यात आलेली ही रेल्वे पश्चिम मध्य रेल्वेकडून संचलित करण्यात येईल. या एक्स्प्रेसची कोल्हापुरात देखभाल दुरुस्ती केली जाईल. यामुळे कोल्हापूर पुणे येथील व प्रवाशांना मध्य प्रदेशातील जबलपूरजवळ असलेल्या रिवा येथे थेट जाता येणार आहे. विद्यमान प्रवाशांसाठी रिवा-नागपूर व नागपूर कोल्हापूर यांच्यात आरक्षण कोटा निश्चित केला जाईल.