कोल्हापूरच्या इंडियन स्पोर्टस् क्लबला ‘विश्वजित चषक’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:24 IST2021-01-21T04:24:39+5:302021-01-21T04:24:39+5:30
कवठेमहांकाळ : कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांच्या वाढदिवसानिमित्त विश्वजित कदम फाउंडेशनच्यावतीने येथे आयोजित क्रिकेट स्पर्धेत कोल्हापूर येथील इंडियन ...

कोल्हापूरच्या इंडियन स्पोर्टस् क्लबला ‘विश्वजित चषक’
कवठेमहांकाळ : कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांच्या वाढदिवसानिमित्त विश्वजित कदम फाउंडेशनच्यावतीने येथे आयोजित क्रिकेट स्पर्धेत कोल्हापूर येथील इंडियन स्पोर्टस् क्लबने विश्वजित चषक पटकावला.
येथील महांकाली सहकारी साखर कारखान्याच्या मैदानावर विश्वजित चषक क्रिकेट स्पर्धा झाल्या. युवा नेते जितेश कदम यांच्या हस्ते उद्घाटन झाले.
विजेत्यांना रोख पारितोषिक व चषक देण्यात आले.
प्रथम क्रमांक (५१ हजार रुपये बक्षीस) : इंडियन स्पोर्टस् कोल्हापूर, द्वितीय क्रमांक (३१ हजार) : दिघंची स्पोर्ट्स, दिघंची, तृतीय क्रमांक (१५ हजार) : मुबारक स्पोर्ट्स, विजापूर, चतुर्थ क्रमांक (११ हजार) : करोली स्पोर्ट्स, करोली यांनी मिळविला. उद्योजक मयूर पाटील यांच्या हस्ते स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले. या स्पर्धेचे ड्रोन कॅमेराद्वारे यु ट्युबद्वारे थेट प्रक्षेपण झाले. आंतरराष्ट्रीय दर्जाचे मैदान तयार करून या स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. मुंबईच्या पंचांना आमंत्रित करण्यात आले होते. चिपळूणचे सुप्रसिद्ध समालोचक अमित यांनी समालोचन केले.
महाराष्ट्र व कर्नाटक राज्यांतील ३२ क्रिकेट संघांनी सहभाग घेतला. विश्वजित युथ फौंडेशन कवठेमहांकाळचे अध्यक्ष उदयसिंह शिंदे यांनी संयोजन केले.