कोकरुड पोलीस ठाण्याचा कारभार उत्तम : कृष्णात पिंगळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:17 IST2021-07-12T04:17:37+5:302021-07-12T04:17:37+5:30

कोकरुड : कायदा सुव्यवस्था अबाधित राखत सामाजिक सलाेखा कायम ठेवून कोकरुड पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक ज्ञानदेव वाघ आणि त्यांच्या ...

Kokrud police station is well run: Krishna Pingale | कोकरुड पोलीस ठाण्याचा कारभार उत्तम : कृष्णात पिंगळे

कोकरुड पोलीस ठाण्याचा कारभार उत्तम : कृष्णात पिंगळे

कोकरुड : कायदा सुव्यवस्था अबाधित राखत सामाजिक सलाेखा कायम ठेवून कोकरुड पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक ज्ञानदेव वाघ आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी उत्तम काम केले आहे, असे प्रतिपादन इस्लामपूर उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णात पिंगळे यांनी केले.

ते कोकरुड (ता. शिराळा) येथे शनिवारी झालेल्या पोलीस स्थानकातील कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीनिमित आयोजित सत्कार कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. कोकरुडचे सहाय्यक उपनिरीक्षक ज्ञानदेव वाघ प्रमुख उपस्थित होते. यावेळी कृष्णात पिंगळे यांच्या हस्ते हवालदार एच. एस. साठे यांची सहाय्यक उपनिरीक्षकपदी, पोलीस नाईक व्ही. डी. पाटील यांची हवालदारपदी व कॉन्स्टेबल बी. जी. आपटे यांची पोलीस नाईकपदी पदोन्नती झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. यावेळी कोकरुड पोलीस ठाण्याकडील सर्व कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: Kokrud police station is well run: Krishna Pingale