सावळीत तरुणावर चाकू हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:28 IST2021-05-12T04:28:34+5:302021-05-12T04:28:34+5:30

कुपवाड : सावळी (ता. मिरज) येथील सचिन सीताराम पवार (वय २१, रा. साईनगर, सावळी) या तरुणावर रागाने बघितल्याच्या कारणावरून ...

A knife attack on a young man in the shadows | सावळीत तरुणावर चाकू हल्ला

सावळीत तरुणावर चाकू हल्ला

कुपवाड : सावळी (ता. मिरज) येथील सचिन सीताराम पवार (वय २१, रा. साईनगर, सावळी) या तरुणावर रागाने बघितल्याच्या कारणावरून तीन संशयितांनी चाकू हल्ला करून जखमी केले. याप्रकरणी कुपवाड पोलिसात तीनजणांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

आदित्य ऊर्फ बबलू मोरे, प्रेम मोरे, अभय मोरे अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत.

मंगळवारी दुपारी जखमी सचिन पवार हा सावळीतील झेंडा चौकात आला होता. यावेळी संशयित आदित्य याने रागाने बघत असल्याच्या कारणावरून सचिनच्या छातीवर चाकूने वार केले.

तर त्याचे साथीदार प्रेम व अभय यांनी त्याला ठोसा व बुक्क्यांनी बेदम मारहाण करून जखमी केले. त्याला दमदाटी व शिवीगाळ केली, अशी तक्रार जखमी सचिन याने कुपवाड पोलिसात मंगळवारी रात्री उशिरा दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी तीनजणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. हवालदार प्रदीप भोसले तपास करीत आहेत.

Web Title: A knife attack on a young man in the shadows