दुधेभावीत शेतजमिनीच्या वादातून चुलत्यावर चाकूहल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:19 IST2021-06-10T04:19:33+5:302021-06-10T04:19:33+5:30

दुधेभावी येथील दिनकर बंडगर व शिवाजी बंडगर या भावांमध्ये शेतजमिनीचा जुना वाद आहे. बुधवारी सकाळी दिनकर बंडगर त्यांचा मुलगा ...

A knife attack on a cousin over a milk farm dispute | दुधेभावीत शेतजमिनीच्या वादातून चुलत्यावर चाकूहल्ला

दुधेभावीत शेतजमिनीच्या वादातून चुलत्यावर चाकूहल्ला

दुधेभावी येथील दिनकर बंडगर व शिवाजी बंडगर या भावांमध्ये शेतजमिनीचा जुना वाद आहे.

बुधवारी सकाळी दिनकर बंडगर त्यांचा मुलगा विशाल, पत्नी नकुसा हे खत विस्कटण्यासाठी शेतात गेले होते. यावेळी शिवाजी बंडगर, कुंडलिक ऊर्फ शुभम बंडगर, बबन बंडगर, बायनाबाई बंडगर, अंजली बंडगर हे तेथे आले. शिवाजी याने दिनकर यांना शिवीगाळ करीत ‘खत विस्कटू नको’ असे म्हणत काठीने मारहाण करण्यास सुरुवात केली. या झटापटीत दिनकर खाली पडले. तेवढ्यात शिवाजी याचा मुलगा कुंडलिक ऊर्फ शुभम चाकू घेऊन आला. ‘तुला आज जिवंत ठेवत नाही’ असे म्हणत त्याने दिनकर यांच्यावर वार केला; परंतु दिनकर यांची पत्नी नकुसा तिथे हाेती. नकुसा यांच्या हातावर हा वार झाला. त्यात त्या जखमी झाल्या. त्यांना ढकलून देत कुंडलिकने दुसरा वार दिनकर यांच्या पोटात उजव्या बाजूला केला. यात दिनकर बंडगर हे गंभीर जखमी झाले. नातेवाइकांनी त्यांना तातडीने कवठेमहांकाळ उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. प्रकृती गंभीर असल्याने प्राथमिक उपचार करून त्यांंना सांगली येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.

घटनेची माहिती मिळताच कवठेमहांकाळचे पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे, जत विभागीय पोलीस अधिकारी रत्नाकर नवले यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी शिवाजी बंडगर, कुंडलिक बंडगर, बबन बंडगर, बायनाबाई बंडगर, अंजली बंडगर यांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक शिवाजी करे करीत आहेत.

Web Title: A knife attack on a cousin over a milk farm dispute

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.