सोनी विकास सोसायटीच्या अध्यक्षपदी किरण माळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:27 IST2021-03-23T04:27:10+5:302021-03-23T04:27:10+5:30

सोनी येथे विकास सोसायटीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल किरण माळी यांचा सत्कार बाजार समितीचे सभापती दिनकर पाटील यांनी केला. ...

Kiran Mali as President of Sony Development Society | सोनी विकास सोसायटीच्या अध्यक्षपदी किरण माळी

सोनी विकास सोसायटीच्या अध्यक्षपदी किरण माळी

सोनी येथे विकास सोसायटीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल किरण माळी यांचा सत्कार बाजार समितीचे सभापती दिनकर पाटील यांनी केला. यावेळी निवडणूक अधिकारी गणेश काटकर यांच्यासह संचालक उपस्थित होते.

मिरज : सोनी विकास सोसायटीच्या अध्यक्षपदी किरण माळी यांची बिनविरोध निवड झाली. संजय माने यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर माळी यांची निवड झाली. निवडणूक अधिकारी म्हणून गणेश काटकर यांनी काम पाहिले. यावेळी सांगली बाजार समितीचे सभापती दिनकर पाटील, संचालक जीवन पाटील, पंचायत समिती सदस्य रंगराव जाधव, उपसरपंच श्रीकांत जाधव, प्रा. उल्हास माळकर, जयसिंग यादव, अंकुश पाटील, सुधीर जाधव, संजय माने, उपाध्यक्षा वैशाली पाटील, माजी सरपंच शामजी ढोबळे, गजानन पाटील, रामचंद्र पाटील, सुरेश नरुटे, सचिव मोहन चव्हाण आदी उपस्थित होते.

Web Title: Kiran Mali as President of Sony Development Society