गोटेवाडीत तरुणाचे अपहरण; मुकादमावर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:28 IST2021-03-16T04:28:33+5:302021-03-16T04:28:33+5:30
दीड महिन्यापासून सरवदे या तुरची कारखाना येथे ऊसतोडणीसाठी आल्या आहेत. १० मार्च रोजी सायंकाळी सहाच्यासुमारास त्यांचा मुलगा नितीन हा ...

गोटेवाडीत तरुणाचे अपहरण; मुकादमावर गुन्हा
दीड महिन्यापासून सरवदे या तुरची कारखाना येथे ऊसतोडणीसाठी आल्या आहेत. १० मार्च रोजी सायंकाळी सहाच्यासुमारास त्यांचा मुलगा नितीन हा उसाने भरलेला ट्रॅक्टर पुणदी गावातून तुरची कारखाना येथे खाली करून येतो, असे सांगून गेला. त्यानंतर तो त्या दिवशी घरीच आलाच नाही. दि.११ मार्चरोजी सकाळी ११ च्यादरम्यान लता सरवदे, त्यांचा मुलगा बाळू याने नितीनच्या फोनवर कॉल करुन व तू कोठे आहेस, असे विचारले. तेव्हा त्याचा मोबाईल जीवन घुले याने घेऊन तुम्ही काय फोन करू नका, तुमच्या मुलास मुकादम रामधन नागरगोजे यांनी पळवून नेले आहे, असे सांगितले. त्यानंतर फिर्यादी यांनी रामधन नागरगोजे यांना फोन करून विचारले असता, उडवाउडवीची उत्तरे दिली. यामुळे
संशय असल्याने लता सरवदे यांनी नागरगोजे याच्याविरुध्द फिर्याद दिली आहे.