शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
2
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
3
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
4
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
5
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
6
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
7
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
8
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
9
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
10
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
11
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
12
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
13
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
14
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
15
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
16
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
17
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
18
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
19
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
20
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीतील बेणापूरच्या तरुणाचे निवडणुकीच्या वादातून अपहरण, दोन संशयितांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2022 14:12 IST

उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपल्यानंतर दिले सोडून

विटा : खानापूर तालुक्यातील बेणापूर-विठ्ठलनगर येथील उदय आनंदराव भोसले (वय ३८) या तरुणाचे अपहरण पैशाच्या वादातून नव्हे तर बेणापूर ग्रामपंचायत निवडणुकीचा अर्ज भरण्याच्या वादातून झाल्याचा अपहृत पीडित तरुणाने पोलिसांत जबाब दिला आहे. यात चौघांचा समावेश असल्याचेही त्याने पोलिसांना सांगितले.विटा पोलिसांनी गोरख तुकाराम माने (वय ४३, रा. करंजे, ता. खानापूर) व गोविंद देवाप्पा महानवर (वय ४८, रा. पाचेगाव, ता.सांगोला) या दोघांना अटक केली आहे. मुख्य संशयित गब्बर उर्फ प्रताप ज्ञानू करचे (रा. पाचेगाव), मिथून घाडगे (रा. हतीत, ता. सांगोला) हे दोघेजण फरार आहेत.विठ्ठलनगर (बेणापूर) येथील उदय भोसले या तरुणाचे दि. १ डिसेंबर रोजी खानापूर येथील यश कॉम्प्युटर सेंटर येथून भरदिवसा अपहरण झाले होते. याप्रकरणी पत्नी छाया भोसले यांनी गब्बर उर्फ प्रताप करचे याच्यासह अनोळखी तरुणांविरूद्ध विटा पोलिसांत गुन्हा दाखल केला होता.या प्रकरणाचा तपास सुरू असताना अपहरणाच्या तिसऱ्या दिवशी उदय भोसले हे खानापूर पोलिस दूरक्षेत्रात आले. त्यावेळी त्यांचा पोलिसांनी जबाब घेतला. मी बेणापूर ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज ऑनलाइन भरण्यासाठी खानापूर येथील कॉम्प्युटर सेंटरमध्ये आलो असताना गब्बर करचे व त्याच्या साथीदारांनी माझे दुचाकीवरून अपहरण केले. त्यांनी मला मोटारीतून टेंभुर्णी, मोडनिंब परिसरात नेले. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपल्यानंतर त्यांनी मला सोडून दिले. मी बेणापूर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी अर्ज भरू नये, यासाठी चौघांनी माझे अपहरण केल्याचे उदय भोसले यांनी पोलिसांना सांगितले.याप्रकरणी गोरख माने व गोविंद महानवर यांना अटक केली असून गब्बर करचे व मिथून घाडगे हे फरार आहेत. घटनेत वापरलेली मोटार (क्र. एम.एच.-०९-ईजी-०३३८) पोलिसांनी जप्त केली आहे. अटक केलेल्या दोघांना विटा न्यायालयात हजर केले असता त्यांना मंगळवारपर्यंत पोलिस कोठडी दिली आहे.बेणापूर ग्रामपंचायत निवडणुकीशी संबंध काय? अपहरण करणारा मुख्य संशयित गब्बर हा सांगोला तालुक्यातील पाचेगाव येथील आहे. उदय भोसले यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबानुसार बेणापूर ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अर्ज भरू नये म्हणून अपहरण केले असेल तर संशयित गब्बर करचे हा सांगोला तालुक्यातील असताना त्याचा खानापूर तालुक्यातील बेणापूर ग्रामपंचायत निवडणुकीशी संबंध काय? असा सवाल बेणापूरचे ग्रामस्थ उपस्थित करीत आहेत

टॅग्स :Sangliसांगलीgram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूकCrime Newsगुन्हेगारी