शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

तीन लाखांसाठी तरुणाचे अपहरण, सांगलीत थरारक पाठलागानंतर दोघे खंडणीबहाद्दर जेरबंद

By घनशाम नवाथे | Updated: April 1, 2024 13:24 IST

तुकडे करून टाकण्याची धमकी

सांगली : येथील तरुण व्यावसायिकाचे भर दुपारी अपहरण करून व्हिडीओ कॉल करून मित्राकडे तीन लाखांची खंडणी दे, नाहीतर तुकडे-तुकडे करून मारून टाकतो अशी धमकी दिल्याचा प्रकार शनिवारी घडला. सांगली शहर पोलिसांनी दोघांचा सायंकाळपासून माग काढण्याचा प्रयत्न केला. अखेर पहाटे अडीचच्या सुमारास वालचंद महाविद्यालयासमोर मोटारीचा थरारक पाठलाग करून नीलेश बाळासाहेब गालिंदे (वय ३०, रा. आनंद टॉकीजसमोर, गावभाग), मनोज मोहनसिंग दुबे (वय ३२, रा. सहावी गल्ली, वारणाली) या दोघांना जेरबंद केले.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, फिर्यादी सूरज बाळासाहेब पाटील (वय ३०, हरिपूर रस्ता, पाटणे प्लॉट, सांगली) यांचा मोबाइल विक्रीचा व्यवसाय आहे. संशयित नीलेश आणि मनोज या दोघांची ओळख होती. नीलेश आणि मनोज या दोघांनी शनिवारी दुपारी दीड वाजता सूरज यास जबरदस्तीने मोटार (एमएच ०९ एजे ९९७०) मध्ये बसवून भोसे (ता. मिरज) येथे नेले. तेथील तलावाकडे नेऊन सूरज यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.अंगावरील कपडे काढून तुला जिवंत सोडत नाही अशी धमकी दिली. मनोज याने सूरज यांचा मित्र विनायक आंबी (रा. शंभर फुटी रस्ता) याच्या मोबाइलवर व्हिडीओ कॉल केला. कॉलवर सूरज याचे कपडे काढून खाली बसवल्याचे दाखवले. तो जिवंत पाहिजे असेल तर तीन लाख रुपये खात्यावर टाक, नाहीतर त्याचे तुकडे तुकडे करून मारून टाकीन, अशी धमकी दिली.आंबी यांनी सांगली शहर पोलिस ठाण्यात धाव घेतली. पोलिस निरीक्षक संजय मोरे यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेला तत्काळ पीडित तरूणाची सुटका करण्याचे आदेश दिले. गुन्हे प्रकटीकरण शाखेचे उपनिरीक्षक महादेव पोवार आणि पथकाने तांत्रिक तपासातून माग काढण्याचा प्रयत्न केला. तेव्हा भोसे, अंकली, हातकणंगले, दानोळी या मार्गांवर चकवा दिला.

रात्री उशिरापासून पोलिस पथक मागावर होते. मध्यरात्रीनंतर पहाटे अडीचच्या सुमारास संशयित मिरजेहून पुन्हा सांगलीकडे येत असल्याची माहिती मिळाली. तेव्हा वालचंद महाविद्यालयासमोर थरारक पाठलाग करून नीलेश आणि मनोजची मोटार अडवली. दोघांना ताब्यात घेत सूरज यांची सुटका केली. गुन्ह्यात वापरलेली मोटार जप्त केली.

चकवा देऊनही अखेर पकडलेअपहरणकर्ते सायंकाळपासून चकवा देत होते. तरीही पोलिसांनी चिकाटीने तपास सुरू ठेवला. उपनिरीक्षक पोवार, कर्मचारी सचिन शिंदे, संदीप पाटील, मच्छिंद्र बर्डे, रफिक मुलाणी, विनायक शिंदे, गणेश कांबळे, संतोष गळवे, गौतम कांबळे, संदीप कुंभार, योगेश सटाले, सुमित सूर्यवंशी, पृथ्वीराज कोळी, कॅप्टन गुंडवाडे यांच्या पथकाने अखेर पहाटे मोहीम फत्ते केली

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस