शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

प्रेमीयुगुलाच्या पलायनानंतर मुलाच्या आईचे अपहरण : इस्लामपूर माणिकवाडीतील प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2017 23:50 IST

इस्लामपूर : माणिकवाडी (ता. वाळवा) येथील सज्ञान प्रेमीयुगुलाने पलायन केल्यानंतर, त्यातील युवतीस पळवून नेल्याचा राग मनात धरुन युवतीच्या मामाने यातील मुलाच्या आईचे अपहरण करुन तिला काळमवाडी येथील सुळकीच्या डोंगरावर

इस्लामपूर : माणिकवाडी (ता. वाळवा) येथील सज्ञान प्रेमीयुगुलाने पलायन केल्यानंतर, त्यातील युवतीस पळवून नेल्याचा राग मनात धरुन युवतीच्या मामाने यातील मुलाच्या आईचे अपहरण करुन तिला काळमवाडी येथील सुळकीच्या डोंगरावर नेऊन गजाने मारहाण करुन जखमी केल्याची घटना घडली. या नाट्यमय घडामोडीत मुलाच्या नातेवाईकांनी मुलीच्या कसबे डिग्रज (ता. मिरज) येथील मामाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.

मुलीच्या मामाविरुद्ध पोलिसांनी महिलेच्या अपहरणाविरुध्द मारहाण करण्याचा गुन्हा नोंद केला आहे. अपहरणातील चारचाकी वाहनही पोलिसांनी जप्त केले आहे. याप्रकरणी अपहरण झालेल्या सौ. यशोदा दिलीप शिंदे (वय ४८, रा. माणिकवाडी) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे.

यशोदा शिंदे यांचा २७ वर्षीय मुलगा आणि गावातीलच २३ वर्षीय मुलीने २२ नोव्हेंबरच्या पहाटे पलायन केले. त्याचदिवशी रात्री दहाच्या सुमारास यशोदा शिंदे पती आणि दुसरा मुलगा प्रल्हाद यांच्यासमवेत घरी होत्या. मुलीचे चुलते आणि मामा त्यांच्या घरी आले. दिलीप शिंदे व त्यांचा मुलगा प्रल्हाद याला सोबत घेऊन ते निघून गेले. त्यानंतर रात्री अडीचच्या सुमारास मुलीचा मामा पुन्हा शिंदे यांच्या घरी आला व त्याने यशोदा शिंदे यांना, माझी भाची व तुझा मुलगा कोठे आहे ते सांग, असे म्हणत शिवीगाळ करुन, भाची मिळत नाही तोपर्यंत तुला सोडत नाही, असे ठणकावत यशोदा शिंदे यांना जबरदस्तीने गाडीत बसवले. तेथून धमकी आणि दमदाटी करतच डिग्रज येथे नेले. माझी भाची कोठे आहे ते सांग, नाही तर तुला गाडीखाली घालून मारतो, अशी धमकी दिली.

रात्रभर शिंदे यांना त्याने वाहनातच कोंडून ठेवले.दुसºयादिवशी २३ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजता यशोदा शिंदे यांना घेऊन मुलीचा मामा काळमवाडीतील सुळकीच्या डोंगरावर आला. तेथे त्याने लोखंडी गजाने सौ. शिंदे यांना मारहाण केली. या मारहाणीत त्यांच्या हाताची बोटे मोडली. यावेळी त्यांनी आरडाओरडा सुरु ठेवला होता. त्याचवेळी तेथे शिंदे यांचा मुलगा प्रल्हाद, पुतण्या सयाजी व इतर नातेवाईक आले. प्रल्हादने मुलीच्या मामाला मारहाणीचा जाब विचारल्यावर, त्यालाही मारहाण करण्यात आली. त्यानंतर नातेवाईकांनी त्याला पकडून घटनेची पोलिसांना माहिती दिली. सहाय्यक पोलिस निरीक्षक संग्राम शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने काळमवाडी येथे जाऊन मुलीच्या मामाला वाहनासह ताब्यात घेतले.रात्रभर वाहनात कोंडलेयशोदा शिंदे यांना, माझी भाची व तुझा मुलगा कोठे आहे ते सांग, असे म्हणत शिवीगाळ करुन, भाची मिळत नाही तोपर्यंत तुला सोडत नाही, असे ठणकावत यशोदा शिंदे यांना जबरदस्तीने गाडीत बसवले. तेथून धमकी आणि दमदाटी करतच डिग्रज येथे नेले. माझी भाची कोठे आहे ते सांग, नाही तर तुला गाडीखाली घालून मारतो, अशी धमकी दिली. रात्रभर शिंदे यांना त्याने वाहनातच कोंडून ठेवले.दुसºयादिवशी यशोदा शिंदे यांना घेऊन मुलीचा मामा काळमवाडीतील सुळकीच्या डोंगरावर आला. तेथे त्याने लोखंडी गजाने सौ. शिंदे यांना मारहाण केली.

टॅग्स :PoliceपोलिसCrimeगुन्हा