इस्लामपुरात दर्शनरांगेत युवकावर खुनीहल्ला

By Admin | Updated: September 3, 2014 23:53 IST2014-09-03T23:53:18+5:302014-09-03T23:53:18+5:30

प्रकृती अत्यवस्थ : डोक्यात फरशी घातली

Khunhahalla on the young man's face in Islampura | इस्लामपुरात दर्शनरांगेत युवकावर खुनीहल्ला

इस्लामपुरात दर्शनरांगेत युवकावर खुनीहल्ला

इस्लामपूर : शहरात गणेशोत्सवाची धामधूम सुरू असतानाच येथील जावडेकर चौकातील गणपती दर्शनासाठी रांगेत उभा राहिलेल्या एका १८ वर्षाच्या मुलाच्या डोक्यात फरशीचा घाव घालून त्याला गंभीर जखमी केल्याची घटना घडली. या हल्ल्यात हा मुलगा रक्ताच्या थारोळ््यात बेशुध्दावस्थेत पडला होता. मंगळवारी रात्री १0.३0 च्या सुमारास हा जीवघेणा हल्ला झाला. हल्लेखोरांची नावे समजू शकली नाहीत.
विनोद लक्ष्मण जाधव (वय १८, रा. जाधव गल्ली, उरुण) असे गंभीर जखमी झालेल्या मुलाचे नाव आहे. त्याला उपचारासाठी कोल्हापूरच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तेथे अतिदक्षता विभागात त्याच्यावर उपचार सुरू आहेत. याबाबत मिळालेली माहिती अशी, विनोद हा काल रात्री आपल्या मित्रांसमवेत गणपती बघण्यासाठी गेला होता. जावडेकर चौकातील एका देखावा मंडळाच्या गणपती दर्शनासाठी विनोद हा रांगेत उभा होता. त्यावेळी अज्ञात हल्लेखाराने पाठीमागून त्याच्या डोक्यात फरशीचा घाव घातला. फरशीचा हा फटका डोक्यात वर्मी बसल्याने विनोद हा रक्ताच्या थारोळ््यात बेशुध्द होऊन तेथेच कोसळला. शहरातील खासगी रुग्णालयात प्राथमिक उपचार घेऊन त्याला कोल्हापूरला हलवण्यात आले. या घटनेची पोलिसांत नोंद झाली नव्हती. (वार्ताहर)

Web Title: Khunhahalla on the young man's face in Islampura

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.