नजरुद्दीन नायकवडी यांना खाशाबा जाधव क्रीडामहर्षी पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:39 IST2021-02-26T04:39:05+5:302021-02-26T04:39:05+5:30

फोटो ओळ - नजरुद्दीन नायकवडी यांना खाशाबा जाधव राष्ट्रीय क्रीडा महर्षी पुरस्काराने राज्य कुस्तीगीर परिषदेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे यांच्या ...

Khashaba Jadhav Kridamaharshi Award to Najruddin Nayakwadi | नजरुद्दीन नायकवडी यांना खाशाबा जाधव क्रीडामहर्षी पुरस्कार

नजरुद्दीन नायकवडी यांना खाशाबा जाधव क्रीडामहर्षी पुरस्कार

फोटो ओळ - नजरुद्दीन नायकवडी यांना खाशाबा जाधव राष्ट्रीय क्रीडा महर्षी पुरस्काराने राज्य कुस्तीगीर परिषदेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यावेळी प्रभाकर देशमुख, हिंदकेसरी पै. दीनानाथ सिंह, सर्जेराव शिंदे उपस्थित होते.

लोकमत न्यूज नेटवर्क

इस्लामपूर : बोरगाव (ता. वाळवा) येथील कुस्ती मार्गदर्शक, शिवछत्रपती पुरस्कार विजेते नजरुद्दीन नायकवडी यांना क्रीडा क्षेत्रातील ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव राष्ट्रीय क्रीडा महर्षी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

कऱ्हाड येथील यशवंतराव चव्हाण स्मृतिसदन येथे सत्कार करण्यात आला.

महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे यांच्या हस्ते मानपत्र, सन्मानचिन्ह व ब्लेझर देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी प्रभाकर देशमुख, हिंदकेसरी पै. दीनानाथ सिंह, महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे उपाध्यक्ष सर्जेराव शिंदे, भारतीय कुस्ती महासंघाचे उपाध्यक्ष हरीश कदम, सातारा जिल्हा आरपीआयचे अध्यक्ष अशोकराव गायकवाड, आशियाई सुवर्णपदकाचे मानकरी प्रा. अमोल साठे, प्रा. अरुण पिसाळ, प्रा. विनोद कदम, आदर्श वस्ताद हरिभाऊ साठे, बालसिद्ध केसरी पै. प्रा. रमेश थोरात उपस्थित होते.

Web Title: Khashaba Jadhav Kridamaharshi Award to Najruddin Nayakwadi