शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
3
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
4
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
5
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
6
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
7
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
8
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
9
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
10
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
11
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
12
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
13
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
14
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
15
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
16
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
17
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
18
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
19
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
20
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

सांगली जिल्ह्यात पावणेतीन लाख हेक्टर्सवर होणार खरीप पेरणी, कृषी विभागाकडून तयारी सुरू 

By अशोक डोंबाळे | Updated: June 3, 2023 18:45 IST

सांगली : जिल्ह्यात यंदा दोन लाख ७२ हजार हेक्टर्सवर क्षेत्रावर खरिपाची पेरणी होणार आहे. यंदा ज्वारी, बाजरी, भुईमुगाच्या क्षेत्रात ...

सांगली : जिल्ह्यात यंदा दोन लाख ७२ हजार हेक्टर्सवर क्षेत्रावर खरिपाची पेरणी होणार आहे. यंदा ज्वारी, बाजरी, भुईमुगाच्या क्षेत्रात घट, तर मक्याचे क्षेत्र वाढणार आहे. खरिपाच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने तयारी सुरू केली आहे. एक लाख ३८ हजार टन खत आणि ३८ हजार क्विंटल बियाणांची मागणी नोंदविली आहे. सरकारी आणि खासगी कंपन्यांकडून खते आणि बियाणांचा पुरवठा सुरू झाला आहे.मान्सूनला महिन्याभराचा अवधी असला तरी जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाने खरीप हंगामाची संपूर्ण तयारी केली आहे. शेतकऱ्यांसाठी प्रात्यक्षिके, पेरणीपूर्व मशागती, पीक प्रात्यक्षिक, पीक उत्पादन वाढीचे क्लस्टर, हुमणी कीड नियंत्रण मोहीम राबविली जात आहे. हंगामासाठी बियाणे, खते यांसह आवश्यक ती तयारी केली आहे. जिल्ह्यात खरिपाच्या पेरणीसाठी दोन लाख ७१ हजार ७०४ हेक्टर क्षेत्र आहे. ज्वारी, भात, बाजरीच्या क्षेत्रात घट, तर सोयाबीन, मक्याचे क्षेत्र वाढणार आहे. शिराळा तालुक्यात भात पिकाचे क्षेत्र जास्त आहे. यंदा मात्र त्यामध्ये घट होऊन १४ हजार ७३२ हेक्टर क्षेत्रावर पेरणी होईल. वाळवा, पलूस, कडेगाव, शिराळा, मिरज पश्चिम भागात सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. गतवर्षी सोयाबीनचे ५१ हजार हेक्टर क्षेत्र होते, त्यामध्ये वाढ होऊन ५४ हजार २०१ हेक्टर क्षेत्रावर पेरणी होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी सध्या खरीप पेरणीसाठी पेरणीपूर्व मशागती करून शेत तयार ठेवले आहे. मान्सून दाखल होताच शेतकरी पेरणीसाठी गडबड करण्याची शक्यता आहे.

अशी केली बियाणांची मागणीहंगामासाठी ‘महाबीज’ आणि खासगी कंपन्यांकडून सुमारे ३२ हजार ६०४ क्विंटल बियाणांची मागणी केली आहे. यामध्ये भात पाच हजार ६५७, ज्वारी तीन हजार ८७, बाजरी अडीच हजार, तूर ५३७, मूग १७७, उडीद एक हजार ३७, भुईमूग एक हजार २३७, सोयाबीन ११ हजार ६६८, सूर्यफूल २२१, मका सात हजार क्विंटल बियाणांची मागणी केली आहे.

खरीप पेरणी क्षेत्र (हेक्टरमध्ये)पीक - क्षेत्रज्वारी ३००००बाजरी ५६९४१सोयाबीन ५४२०१भात १४७३२मका ४६४९६सूर्यफूल २२१२तूर १०२३८मूग ५६१२उडीद १९७५६एकूण - २७१७०४

पाऊस चांगला पडल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरणीसाठी गडबड करण्याची गरज नाही. पुरेसा पाऊस आणि जमिनीत ओलावा चांगला झाल्यानंतरच शेतकऱ्यांनी खरीप पेरणी करण्याची गरज आहे. - विवेक कुंभार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, सांगली.

टॅग्स :Sangliसांगलीagricultureशेती