शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
2
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
3
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
4
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
5
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
6
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
7
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
8
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
9
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
10
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
11
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
12
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
13
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
14
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
15
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
16
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
17
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
18
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
19
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
20
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द

सांगली जिल्ह्यात ३.६६ हेक्टरवर होणार खरिपाची पेरणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2020 11:27 IST

एक लाख २६ हजार २३१ टन रासायनिक खते आणि ३२ हजार ४०९ क्विंटल बियाणांची मागणी केली आहे. त्यापैकी खते ४८ हजार ८४० टन, तर बियाणे २३ हजार ५७१ क्विंटल उपलब्ध आहेत.

ठळक मुद्दे सव्वालाख टन रासायनिक खते, ३२४०९ क्विंटल बियाणांची मागणी : पेरणीपूर्व मशागती पूर्ण

सांगली : मान्सून पावसाची चाहूल लागल्यामुळे शेतकरी पेरणीपूर्व मशागती करुन खरीप पेरणीसाठी सज्ज झाला आहे. जिल्ह्यात तीन लाख ६६ हजार ८०० हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरणी होणार असून सरासरीच्या १८ हजार ३५० हेक्टरवर पेरणी जास्त होण्याचा कृषी विभागाच्या अधिकाºयांचा अंदाज आहे. एक लाख २६ हजार २३१ टन रासायनिक खते आणि ३२ हजार ४०९ क्विंटल बियाणांची मागणी केली आहे. त्यापैकी खते ४८ हजार ८४० टन, तर बियाणे २३ हजार ५७१ क्विंटल उपलब्ध आहेत.

जिल्ह्यात खरीप पेरणीचे सरासरी तीन लाख ४८ हजार ४५० हेक्टर क्षेत्र आहे. वेळेत मान्सूनचा पाऊस दाखल होणार, असा हवामान विभागाचा अंदाज आहे. त्यानुसार जिल्हा परिषद आणि राज्य शासनाच्या कृषी विभागाच्या अधिकाºयांनी नियोजन केले आहे. मान्सून वेळेत दाखल झाल्यास खरीप हंगामामध्ये १८ हजार ३५० हेक्टरने पेरणीचे क्षेत्र वाढणार आहे. २०२० च्या खरीप हंगामात जिल्ह्यात तीन लाख ६६ हजार ८०० हेक्टर क्षेत्रावर पेरणी होण्याची शक्यता आहे. या क्षेत्रासाठी एक लाख २६ हजार २३१ टन रासायनिक खतांची गरज आहे. कोरोनाचा फैलाव असतानाही जिल्ह्यात ४८ हजार ८४० टन खताची उपलब्धता झाली आहे. यामध्ये युरिया ११ हजार ७५० टन, डीएपी १२ हजार २४० टन, एमओपी ११ हजार टन, एनपीकेएस ११ हजार ४६० टन, एसएसपी सहा हजार ७९० टन खत उपलब्ध आहे. खरीप ज्वारी, बाजरी, भात, मका, भुईमूग, सोयाबीन, सूर्यफूल, उडीद, मूग आदीच्या ३२ हजार ४०९ क्विंटल बियाणांची मागणी केली आहे. महाबीजसह अन्य कंपन्यांकडून सध्या जिल्ह्यात २३ हजार ५७१ क्विंटल बियाणे उपलब्ध आहे. महापुरात गेल्यावर्षी सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले होते. या ठिकाणी काही शेतकºयांनी स्वत:हून बदली करुन उसाची लागण केली आहे. कृष्णा आणि वारणा नदीकाठच्या परिसरात सोयाबीन पेरणीचे क्षेत्र घटण्याची शक्यता कृषी विभागाच्या अधिकाºयांचा अंदाज आहे.खरिपातील बियाणांची मागणी (क्विंटल)बियाणे प्रकार मागणी उपलब्ध बियाणेखरीप ज्वारी ३७९५ १०१८बाजरी १४०० ७९५भात २४५४ ३९३२मका ५५६५ ३९६७भुईमूग १९३२ ९३२सोयाबीन १५४८८ १०७९९मूग ४०४ २५०उडीद ९१८ ६९२तूर ३५९ २१सूर्यफूल ९१ २०एकूण ३२४०९ २३५७१

जादा दराने खत विक्री केल्यास परवाने रद्द : विवेक कुंभारकृषी सेवा केंद्र चालकांनी नियमानुसार दर घ्यावेत. जादा दराने पैसे घेतल्याची तक्रार आल्यास तात्काळ परवाना रद्द करण्यात येणार आहे. खते आणि बियाणांमधील बोगसगिरी रोखण्यासाठी कृषी सेवा केंद्र चालकांकडून खते व बियाणे खरेदी करताना पावती घ्यावी. जे ती देणार नाहीत, त्यांच्याबद्दल कृषी विभागाकडे तक्रार केल्यास त्यांच्यावरही कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हा परिषद कृषी विकास अधिकारी विवेक कुंभार यांनी दिला आहे. 

गैरकारभार रोखण्यासाठी ११ भरारी पथकेखरीप हंगामात खते व बियाणांची बोगसगिरी रोखण्यासाठी कृषी विभागाने प्रत्येक तालुक्याला एक आणि जिल्हास्तरावर एक अशी ११ भरारी पथके तयार केली आहेत. प्रत्येक कृषी सेवा केंद्राची तपासणी केली जाणार आहे. प्रत्येक दुकानदाराने दुकानामध्ये दरफलक लावले पाहिजेत, खताचे लिंकिंग करु नये, आदी प्रश्नांवर पथक लक्ष ठेवणार आहे, असेही विवेक कुंभार म्हणाले.

टॅग्स :FarmerशेतकरीSangliसांगली