खरीप आला दाराला, कर्ज मिळेना पिकाला

By Admin | Updated: June 3, 2015 01:01 IST2015-06-03T00:09:21+5:302015-06-03T01:01:37+5:30

जिल्हा बँकेची वाटपात आघाडी : जिल्ह्यात राष्ट्रीयीकृत पंधरा बॅँकांनी घातला पीक कर्जाला खोडा

Kharif reached the door, getting a loan was Pikala | खरीप आला दाराला, कर्ज मिळेना पिकाला

खरीप आला दाराला, कर्ज मिळेना पिकाला

अशोक डोंबाळे - सांगली --खरीप हंगाम तोंडावर येऊन ठेपला असून, जिल्हा प्रशासनाने यावर्षी ८८१ कोटी ४६ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटपाचे नियोजन केले आहे. मात्र, अद्याप जिल्ह्यातील पंधरा राष्ट्रीयीकृत बँकांनी कर्ज वाटपाचा श्रीगणेशाही केला नसल्याने शेतकऱ्यांना खरीप पीक पेरणीसाठी अडचणी येण्याची शक्यता आहे. उर्वरित वीस बँकांनी आतापर्यंत ४३ हजार ४४९ खातेदारांना २१९ कोटी ९८ लाखांचे कर्ज वाटप केले आहे. यामध्ये जिल्हा बँकेने ४२० कोटी ७५ लाख पीक कर्ज वाटपाच्या उद्दिष्टापैकी सर्वाधिक १५८ कोटी १९ लाखांचे कर्ज वाटप करून शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे.
२५ मे पासून रोहिणी नक्षत्राला सुरुवात झाली आहे. ८ जूनला मृग नक्षत्र लागणार आहे. सर्वसाधारणपणे मृग नक्षत्रापासूनच जिल्ह्यात पाऊस पडायला सुरुवात होत असते. उन्हाळी पाऊस जिल्ह्याच्या अनेक भागामध्ये झाला आहे. त्यामुळे मृग नक्षत्रात पेरणीच्या कामांना वेग येतो. आता शेतकरी मान्सूनपूर्व मशागतीच्या कामात व्यस्त आहे. पेरणीसाठी खते आणि बी-बियाणांची जुळवाजुळव करीत आहे. मात्र, गेल्या दोन वर्षातील अवकाळी पाऊस आणि साखरेचे दर उतरल्यामुळे कारखान्यांकडून शेतकऱ्यांना उसाची बिले वेळेवर मिळत नसल्यामुळे ते संकटात सापडले आहेत. शेतकऱ्याला बी-बियाणे खरेदी करण्यासाठी आर्थिक अडचणी येत आहे. तो बँक, सावकार, नातेवाईक यांच्याकडे कर्जासाठी धावपळ करीत असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात सहकारी आणि राष्ट्रीयीकृत ३५ बँका असून, या बँकांनी खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना ८८१ कोटी ४६ लाखांचे कर्ज वाटप केले पाहिजे, असा आराखडा तयार केला आहे. त्यानुसार वीस बँकांनी आतापर्यंत ४३ हजार ४४९ खातेदारांना २१९ कोटी ९८ लाखांचे कर्ज वाटप केले आहे. पंधरा राष्ट्रीयीकृत बँकांनी मात्र खरीप हंगामास सुरुवात झाली तरीही कर्ज वाटपाचा श्रीगणेशाही केला नाही. शेतकऱ्यांना वेळेत कर्ज मिळाल्यास बी-बियाणे व खते खरेदी करण्यासाठी जास्त अडचणींचा सामना करावा लागणार नाही. मात्र बोटावर मोजण्याइतक्याच शेतकऱ्यांना नाममात्र कर्ज देऊन कर्ज वाटपाचा श्रीगणेशा केल्याचे काही ठिकाणी दिसून येत आहे. प्रत्यक्षात मात्र स्थिती वेगळीच असून, अनेकांनी कर्जासाठी अर्ज करूनही त्यांच्या प्रकरणांवर कार्यवाही झालेली नाही.
कृषी विभागाने खरीप पीक पेरणी अहवाल तयार करून विविध बँकांमार्फत कर्ज वाटपाचे उद्दिष्ट निश्चित केले असले तरी, अनेक शेतकऱ्यांना कर्जासाठी हेलपाटे मारावे लागत असल्याचे दिसत आहे. सात-बारावरील हिस्सेदारांची सहमती, यापूर्वीच्या कर्जाचा बोजा, कर्ज नसल्याचा दाखला अशा अनेक अडचणी शेतकऱ्यांसमोर येत आहेत. त्यामुळे कर्ज मिळण्यास आणखी किती दिवसांचा कालावधी लागेल, याची चौकशी करण्यासाठी शेतकरी बँकेचे उंबरे झिजवत आहेत. याकडे जिल्ह्यातील राज्यकर्त्यांनी आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लढणाऱ्या संघटनांनीही आवाज उठविण्याची गरज आहे. त्यामुळे काही शेतकरी, बँकेच्या कर्जापेक्षा नातेवाईक किंवा सावकार यांच्याकडून मिळणारे कर्ज लवकर मिळत असल्याने त्यांच्याकडे वळले असल्याचे चित्र ग्रामीण भागात आहे.


बँकउद्दिष्टसाध्यखातेदार
आंध्रा१७००
बँक आॅफ बडोदा२६.५५ ३.४६१३६
बँक आॅफ इंडिया५८.८०१८.३७१९२३
बँक आॅफ महाराष्ट्र५४.५०२.१४२६८
कॅनरा बँक७.७०१.०९६७
सेन्ट्रल बँक आॅफ इंडिया७.८६०.२३२१
कॉर्पोरेशन बँक७.८०००
देना बँक६१६१.६८५२
आयडीबीआय बँक६८००.४६१२
इंडियन बँक५५१.०४३
इंडियन ओव्हरसीज बँक२.३५०.०३१
ओरिएंटल बँक०.०३००
पंजाब अ‍ॅण्ड सिंध०.३५००
पंजाब नॅशनल०.३२००
स्टेट बँक हैदराबाद०.१६००
बँकउद्दिष्टसाध्यखातेदार
स्टेट बँक आॅफ इंडिया५२.२५१०.३२३७६
सिंडिकेट बँक१.३७००
युको२.४७००
युनियन बँक आॅफ इंडिया३८.२८१.७७१३८
युनायटेड बँक आॅफ इंडिया०.६०००
विजया बँक४.१२०.३६३९
अ‍ॅक्सेस बँक७.७०००
फेडरल६.३२००
एचडीएफसी१७.९०२.१२३८
आयसीआयसीआय९९.००११.५९१५७८
कर्नाटका बँक१.४५०.०७६
रत्नाकर बँक४५.८०२१.३७५५५
विदर्भ, कोकण ग्रामीण३.३५०.२०२०
राज्य व जिल्हा बँक४२०.७५१५८.१९३८२१६
एकूण८८१.४६२१९.९८४३४४९


शेतकऱ्यांच्या मागणीनुसार कर्ज वाटप करणार
पंधरा राष्ट्रीय बँकांनी आतापर्यंत एक रूपयाही कर्ज वाटप केलेले नाही. याप्रकरणी बँकांशी संपर्क साधला असता, अग्रणी बँकेने ठरवून दिलेल्या खरीप पीक कर्जाच्या उद्दिष्टानुसार येत्या महिन्यात शेतकऱ्यांच्या मागणीनुसार आम्ही कर्ज वाटप करणार असल्याचे तेथील प्रशासनाने सांगितले आहे. प्रत्यक्षात किती बँका पीककर्ज वाटप करतात, ते येत्या दोन महिन्यात स्पष्ट होणार आहे.

Web Title: Kharif reached the door, getting a loan was Pikala

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.