खालापूरला एस.टी.तून ४० लाख रुपये जप्त
By Admin | Updated: October 13, 2014 23:35 IST2014-10-13T23:18:47+5:302014-10-13T23:35:41+5:30
टोलनाक्यावर कारवाई : सांगलीत निवडणुकीसाठी जाणारा पैसा पकडला

खालापूरला एस.टी.तून ४० लाख रुपये जप्त
खालापूर : राज्यात मतदानासाठी अवघा एक दिवस शिल्लक असताना खालापूर टोलनाक्यावर मुंबईहून कोल्हापूरकडे जाणाऱ्या एस.टी.तून तब्बल ४० लाखांची रोकड जप्त करण्यात आली. सांगली जिल्ह्यातील निवडणुकीसाठी हे पैसे नेले जात असल्याचे निष्पन्न झाले आहे. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर खालापूर टोलनाक्यावर पोलीस निरीक्षक चंद्रकांत देशमुख आणि निवडणूक भरारी पथकाला एस.टी.तील दोन प्रवाशांकडच्या बॅगांत ही रक्कम आढळली.
पैसे कोणत्या पुढाऱ्याचे, हे गुलदस्त्यात
कृष्ण सरफले आणि सतीश पाटील यांच्या बॅगांमध्ये ही रक्कम आढळली असून, ते सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील मांगले
येथील रहिवासी आहेत.
हे पैसे सांगलीतील कोणत्या राजकीय पुढाऱ्याचे आहेत, याचा उलगडा संध्याकाळपर्यंत होऊ शकला नव्हता. याप्रकरणी चौकशी सुरू असल्याची माहिती खालापूरचे पोलीस निरीक्षक देशमुख यांनी दिली.