शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

‘अलमट्टी’त ३१ जुलैपर्यंत ५० टक्केच पाणीसाठा ठेवा, मेधा पाटकर यांची कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2025 17:33 IST

पाणी वळविण्याची भूमिका चुकीची

सांगली : अलमट्टी धरणामध्ये ३१ जुलैपर्यंत ५० टक्क्यांपेक्षा जास्त पाणीसाठा करू नये, अशी विनंती सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. तसेच, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांना अलमट्टी धरण कारणीभूत असल्यामुळे उंचीही वाढवू नये, अशी मागणी पाटकर यांनी केली आहे.मेधा पाटकर यांनी पत्रात म्हटले की, अलमट्टी धरणाची उंची आणि त्याचा महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशातील शेतकऱ्यांना धोका होत आहे. धरणातील पाणीसाठा करताना केंद्रीय जल आयोगाच्या नियमाचे कर्नाटकच्या जलसंपदा विभागाने पालन केले पाहिजे. ३१ जुलैपर्यंत अलमट्टी धरण ५० टक्क्यांपेक्षा जास्त भरू नये. अलमट्टी धरणातील पाण्याचा प्रवाह, विसर्ग, पाण्याची पातळी, हिप्परगी बंधाऱ्याशी संबंधित निर्णय आणि कारवाई तातडीने करण्याची विनंती आहे. महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांतील तीनशेपेक्षा जास्त गावे आणि शहरांचे काही भाग वाचविण्यासाठी अलमट्टी धरणात मर्यादित पाणीसाठा ठेवणे गरजेचे आहे. महाराष्ट्र सरकारने अलमट्टीची उंची आणि पाण्याची पातळी ५२४ मीटरपर्यंत वाढविण्यास आपला विरोध जाहीर केला आहे. २००५ पासून कृष्णा नदीच्या खोऱ्यातील लोकांनीदेखील अलमट्टी धरणाच्या उंची वाढवण्यास विरोधच केला आहे. त्यांना पूर्णपणे भरपाई मिळालेली नाही किंवा पुनर्वसनदेखील झाले नाही. जर यावर्षी पूर आला, तर हवामान बदल आणि त्याअनुषंगाने, अनियमित पावसाच्या सध्याच्या संदर्भात, तुमच्या नेतृत्वाखालील सरकारने काही अपरिहार्य कृती करायच्या आहेत. त्यामध्ये हिप्परगी बंधाऱ्याचे सर्व दरवाजे पावसाळ्याच्या अखेरीपर्यंत उघडे ठेवणे आवश्यक आहे.

जल आयोगाच्या नियमाचे पालन कराकेंद्रीय जल आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार अलमट्टीसह प्रत्येक जलाशय ३१ जुलैपर्यंत साठवण क्षमतेच्या ५० टक्क्यांपर्यंत आणि ऑगस्टअखेर २३ टक्क्यांपर्यंत रिकामे ठेवणे आवश्यक आहे. १५ सप्टेंबरपर्यंत पूर्ण जलाशय भरता येणार नाही. हवामानातील बदलांमुळे मान्सून १५ सप्टेंबरच्या पुढेही वाढू शकतो. म्हणूनच, ही अंतिम मुदत आणखी वाढवावी लागेल. आतापासूनच पावसाळ्याच्या संपूर्ण कालावधीत पुरेसा विसर्ग चालू ठेवणे आवश्यक आहे, असेही मेधा पाटकर म्हणाल्या.

पाणी वळविण्याची भूमिका चुकीचीमेधा पाटकर म्हणाल्या, महाराष्ट्र सरकारने पुराचे पाणी दुसऱ्या नदीच्या खोऱ्यात वळविण्याची केलेली घोषणादेखील कायदेशीर नाही. पर्यावरणाच्या दृष्टीने सरकारची भूमिका पूर्णत: चुकीची आहे, कारण ती कृष्णा नदी जल न्यायाधिकरणाच्या निकालाचे उल्लंघन करेल. त्यामुळे महापुराचे पाणी दुसऱ्या नदीत वळविता येणार नाही.