के.सी. वग्यानी लोकमान्य संस्थेला ८१ लाख ७ हजार नफा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:28 IST2021-04-09T04:28:49+5:302021-04-09T04:28:49+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क आष्टा : येथील के.सी. वग्यानी लोकमान्य नागरी सहकारी पतसंस्थेला ३१ मार्च अखेर सर्व तरतुदी वजा ...

K.C. Vagyani Lokmanya Sanstha 81 lakh 7 thousand profit | के.सी. वग्यानी लोकमान्य संस्थेला ८१ लाख ७ हजार नफा

के.सी. वग्यानी लोकमान्य संस्थेला ८१ लाख ७ हजार नफा

लोकमत न्यूज नेटवर्क

आष्टा : येथील के.सी. वग्यानी लोकमान्य नागरी सहकारी पतसंस्थेला ३१ मार्च अखेर सर्व तरतुदी वजा जाता ८१ लाख ७ हजार नफा झाल्याची माहिती अध्यक्ष महावीर आवटी यांनी दिली.

महावीर आवटी म्हणाले, संस्थेला ३८ वर्षे पूर्ण झाली असून संस्थेचे भाग भांडवल १ कोटी ९० लाख, इतर निधी ६ कोटी ७९ लाख, ठेवी ५५ कोटी ४८ लाख, कर्ज वाटप ३६ कोटी ४७ लाख, गुंतवणूक २६ कोटी ५५ लाख असून कर्जवसुली ९७.७२ टक्के झाली आहे. संस्थेचा नेट एनपीए शून्य टक्के आहे आष्टा सहकार पंढरीत लोकमान्यच्या संचालक मंडळावर ग्राहकांनी विश्वास दाखवला आहे.

संस्थेच्या सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात मुख्य शाखेसह ६ शाखा कार्यरत आहेत. आष्टा येथे भारत सरकारच्या इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड या कंपनीची सहकार क्षेत्रातील पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव अशी इंडियन गॅस एजन्सी आहे. मागील १८ वर्षे परिसरातील १४५०० ग्राहकांना घरपोच गॅस सेवा देण्यात येत आहे.

वाय एस राजोबा म्हणाले, संस्थापक के.सी. वग्यानी यांच्या खंबीर व अभ्यासू नेतृत्वाखाली तयार झालेल्या कुशल प्रशासनाने संस्थेचे कार्य सुरू आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती भालचंद्र वग्यानी, उपाध्यक्ष अल्लाउद्दीन लतिफ, डॉ सत्यजित वग्यानी, संजय कोले सर्व संचालक सर्व शाखांचे संपर्क मंडळ यांचे सहकार्य लाभत आहे.

Web Title: K.C. Vagyani Lokmanya Sanstha 81 lakh 7 thousand profit