शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: कवठेपिरानची सूरज पाटील टोळी हद्दपार, ‘एसपी’ संदीप घुगेंचा सलामीलाच दणका

By घनशाम नवाथे | Updated: March 2, 2024 16:50 IST

गुन्हेगारी टोळ्या रडारवर

सांगली : खून, दहशत, मारामारी, गांजा विक्रीचे गुन्हे दाखल असलेल्या सूरज संभाजी पाटील (वय २९) व अक्षय नामदेव पाटील (वय २७, रा. कवठेपिरान) या दोघांना सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातून दोन वर्षासाठी हद्दपार केले. नूतन पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी सलामीलाच हा दणका दिला आहे.कवठेपिरान येथील सूरज पाटील हा टोळीचा प्रमुख आहे. तो आणि अक्षय पाटील या दोघांविरूद्ध २०१७ ते २०२२ या कालावधीत खून, खुनानंतर पुरावा नष्ट करणे, मारहाण करणे, गांजा बाळगणे व विक्री करणे असे वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत. दोघेही कायद्याला जुमानत नव्हते.सांगली ग्रामीण पोलिसांनी सूरज पाटील व अक्षय पाटील या दोघांविरूद्ध महाराष्ट्र पोलिस कायदा कलम ५५ नुसार हद्दपारीचा प्रस्ताव अधीक्षक संदीप घुगे यांना सादर केला होता. अधीक्षक घुगे यांनी उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव यांच्याकडे चौकशीसाठी प्रस्ताव पाठवला. उपअधीक्षक जाधव यांनी चौकशी करून दोघांविरूद्ध गुन्ह्याचा व सद्यस्थितीचा अहवाल अधीक्षक घुगे यांना सादर केला.अधीक्षक घुगे यांनी सलग सुनावणी घेऊन नैसर्गिक न्यायतत्वाचा विचार करून टोळीप्रमुख सूरज पाटील व अक्षय पाटील या दोघांना सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातून दोन वर्षासाठी हद्दपार केले. गुन्हेगारी टोळ्यांची दहशत मोडीत काढण्यासाठी ही कारवाई करण्यात आली आहे. अधीक्षक घुगे, अप्पर अधीक्षक रितू खोखर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक सतीश शिंदे, सांगली ग्रामीणचे निरीक्षक राजेश रामाघरे, उपनिरीक्षक सिद्धाप्पा रूपनर, अंमलदार अमर नरळे, दीपक घट्टे, मेघराज रूपनर, सुशिल म्हस्के यांच्या पथकाने कारवाईत सहभाग घेतला.

गुन्हेगारी टोळ्या रडारवरअधीक्षक घुगे यांनी कवठेपिरानच्या दोघांना हद्दपार केल्यानंतर यापुढे गुन्हे करणाऱ्या इतर टोळ्यांवर पोलिसांची करडी नजर ठेवण्यात आली आहे. या टोळ्या नेस्तनाबूत करण्यासाठी कडक कारवाई करण्यात येणार आहे.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस