कवठेमहांकाळला राज्यात आदर्श बनविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:33 IST2021-06-09T04:33:54+5:302021-06-09T04:33:54+5:30

कवठेमहांकाळ : कवठेमहांकाळ नगरीत सर्वांगीण व पर्यावरणपूरक विकासकामे करण्यात कमी पडणार नाही. नगरपंचायत राज्यात आदर्श बनवू, असे प्रतिपादन मुख्याधिकारी ...

Kavthemahankal will be made an ideal in the state | कवठेमहांकाळला राज्यात आदर्श बनविणार

कवठेमहांकाळला राज्यात आदर्श बनविणार

कवठेमहांकाळ : कवठेमहांकाळ नगरीत सर्वांगीण व पर्यावरणपूरक विकासकामे करण्यात कमी पडणार नाही. नगरपंचायत राज्यात आदर्श बनवू, असे प्रतिपादन मुख्याधिकारी डॉ. संतोष मोरे यांनी केले.

शहरात लोकवर्गणीतून साकारलेल्या आयुर्वेद गार्डनचे लोकार्पण नगराध्यक्ष पंडित दळवी यांच्या हस्ते शनिवारी (दि. ५) झाले. यावेळी डॉ. मोरे बोलत होते. यावेळी नगरपंचायतीचे अधिकारी-पदाधिकारी उपस्थित हाेते.

यावेळी पंडित दळवी म्हणाले, कवठेमहांकाळ-जत रोडवरील पाण्याच्या टाकीजवळ ८० आयुर्वेदिक औषधी वनस्पती असलेल्या बगीचा उभारण्यात आला आहे. लोकांना आयुर्वेदिक औषधी वनस्पतींचे महत्त्व समजावे यासाठी आयुर्वेदिक गार्डन संकल्पना निर्माण झाली. आता या बगीचाचे चांगले संवर्धन करूया.

उपनगराध्यक्ष अय्याज मुल्ला म्हणाले, शहरातील जनतेच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहाेत.

यावेळी समन्वयक ऋतुजा गावडे, बांधकाम सभापती सुनील माळी, युवा नेते पृथ्वीराज जाधव, नगरसेवक बाळासाहेब पाटील, चंद्रशेखर सगरे, जालिंदर माने उपस्थित होते.

Web Title: Kavthemahankal will be made an ideal in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.