कवठेमहांकाळ उपजिल्हा रुग्णालय सलाईनवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:27 IST2021-04-02T04:27:09+5:302021-04-02T04:27:09+5:30
घाटनांद्रे/जालिंदर शिंदे : कवठेमहांकाळ येथील उपजिल्हा रुग्णालयात अनेक पदे रिक्त असून सुविधांचा अभाव आहे. रुग्णालयात लिपिक व चतुर्थश्रेणीतील आठ ...

कवठेमहांकाळ उपजिल्हा रुग्णालय सलाईनवर
घाटनांद्रे/जालिंदर शिंदे : कवठेमहांकाळ
येथील उपजिल्हा रुग्णालयात अनेक पदे रिक्त असून सुविधांचा अभाव आहे. रुग्णालयात लिपिक व चतुर्थश्रेणीतील आठ पदे रिक्त आहेत. ती तात्काळ भरावीत अशी मागणी होत आहे.
कवठेमहांकाळ येथे उपजिल्हा रुग्णालयात विविध सोयीसुविधा आहेत. परंतु, सोनोग्राफीसारखी सुविधा दिसून येत नाही. कोरोनासाठीच्या रॅपिड चाचणीचा तुटवडा जाणवतो आहे. रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक, वैद्यकीय अधिकारी ते चतुर्थश्रेणी कर्मचारी अशी एकूण ४१ पदे मंजूर आहेत. त्यापैकी ३३ पदे भरण्यात आली आहेत. परंतु, कनिष्ठ व वरिष्ठ लिपिक, चतुर्थश्रेणी कर्मचारी यांची आठ पदे रिक्त आहेत. त्यामध्ये शिपाई, सफाईगार, थिएटर परिचर व ड्रेसर या पदांचा समावेश आहे. ही रिक्त पदे त्वरित भरण्यासाठी विलंब केला जात आहे. सोनोग्राफी, कोरोना रॅपीड चाचणीसारखी सुविधा उपलब्ध करावी व कर्मचाऱ्यांची रिक्त पदे तात्काळ भरावीत, अशी मागणी होत आहे.
रिक्त पदे
वैद्यकीय अधीक्षक १, सहाय्यक अधीक्षक १, कनिष्ठ लिपिक २,
शिपाई १, सफाईगार १,
थिएटर परिचर १,
ड्रेसर १
चौकट
सोनोग्राफी सुविधा नसल्याने गोची
रुग्णालयात सोनोग्राफीसारखी सुविधा उपलब्ध नसल्याने व सामान्य जनतेला खासगी रुग्णालयातील दर परवडत नसल्याने गोची होत आहे, असे काँग्रेसचे तालुका सरचिटणीस अल्लाबक्ष मुल्ला यांनी सांगितले. कोरोनाच्या जलद चाचणीचा तुटवडा जाणवत असल्याने या रुग्णालयातील कर्मचारी इतर रुग्णालयाचा मार्ग दाखवत असल्याने सामाजिक कार्यकर्ते प्रमोद दिवाण यांनी सांगितले.