शहरं
Join us  
Trending Stories
1
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
2
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
3
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
4
आधी कॅब चालकांची करायचे हत्या, दऱ्यांमध्ये फेकायचे मृतदेह; सीरियल किलरला अखेर अटक
5
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा २०वा हप्ता 'या' दिवशी खात्यात येणार? आत्ताच यादी तपासा!
6
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
7
सोलापूर : 'तुझ्यामुळेच माझी बायको...'; सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच गेला जीव
8
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
9
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
10
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
11
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
12
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
13
ज्या घटनेमुळे बापाने केली हत्या, त्यात आईचा होता सहभाग; कोल्हापुरातील प्रकरणात काय आले समोर?
14
BRICS शिखर परिषदेसाठी PM मोदी ब्राझीलमध्ये दाखल; भारताला काय फायदा? जाणून घ्या...
15
भारतीय चलनी नोटांवर फक्त महात्मा गांधीजींचेच चित्र का? आरबीआयने स्वतःच सांगितले कारण
16
2028 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरणार 'America Party'? इलॉन मस्क यांनी वेगळीच हिंट दिली!
17
संपत्तीवरून वाद झाला, काकीनेच पुतण्याचा गेम केला! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू 
18
अमेरिकेचा मोठा निर्णय! १ ऑगस्टपासून १०० देशांवर लादणार नवीन शुल्क, भारतावर काय परिणाम?
19
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते वडाळा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा
20
Tata च्या Harrier EV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; काही तासांत हजारो युनिट्सची विक्री...

घरकुलाचा हप्ता जमा करण्यासाठी लाचेची मागणी, कवठेमहांकाळला पंचायत समितीचा कर्मचारी ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात

By शरद जाधव | Updated: May 30, 2023 17:26 IST

तक्रारदाराकडे २० हजार रुपयांची लाच मागितली

सांगली : प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकूल बांधकाम करण्यासाठी मंजूर निधीतील हप्ता जमा करून देण्याच्या मोबदल्यात १३ हजारांची लाच स्वीकारताना स्थापत्य अभियांत्रिकी सहायकास रंगेहाथ पकडण्यात आले. अजित मुबारक मुल्ला (वय ४७, रा. शासकीय निवासस्थान, नगरपंचायत चौक, कवठेमहांकाळ) असे कर्मचाऱ्याचे नाव आहे. मुल्ला हा कवठेमहांकाळ पंचायत समितीमध्ये कार्यरत आहे. शहरातील म्हसोबा गेटजवळ सापळा लावून त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली.तक्रारदाराच्या वडीलांच्या नावे प्रधानमंत्री आवास योजनेतून घरकूल मंजूर झाले आहे. या घरकूलाच्या बांधकामासाठी मंजूर निधीतील तिसरा व चौथा हप्ता जमा करण्यासाठी मुल्ला याने तक्रारदाराकडे २० हजार रुपयांची लाच मागितली होती. याबाबत २६ मे रोजी तक्रारदाराने लाचलुचपतकडे तक्रार दाखल केली.लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पडताळणी केली असता, मुल्ला याने २० हजारांची लाच मागून तडजोडीअंती १३ हजार रुपयांची मागणी केल्याचे निष्पन्न झाले होते. मंगळवारी म्हसोबा गेटजवळ ‘लाचलुचपत’ने सापळा लावला होता. यावेळी मुल्ला याने लाचेची मागणी करत ती स्विकारताना त्याला रंगेहाथ पकडण्यात आले. भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमानुसार त्याच्यावर कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.लाचलुचपतचे उपअधीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अजित पाटील, प्रितम चौगुले, पोपट पाटील, सुदर्शन पाटील, उमेश जाधव आदींच्या पथकाने ही कारवाई केली.शासकीय अथवा निमशासकीय कार्यालयातील कामासाठी लाच मागणे हा गुन्हा आहे. त्यामुळे अशाप्रकारे कोणालाही पैसे देऊ नयेत. याबाबतची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करावी असे आवाहन उपअधीक्षक संदीप पाटील यांनी केले.

टॅग्स :SangliसांगलीBribe Caseलाच प्रकरणCrime Newsगुन्हेगारी