कवठेमहांकाळात आर्चीसाठी तरुणाईचे झिंगाट!
By Admin | Updated: May 10, 2016 02:34 IST2016-05-10T02:20:24+5:302016-05-10T02:34:51+5:30
रिंकू कार्यक्रमाच्या ठिकाणी आल्यावर ‘सैराट’वर स्वार झालेली तरुणाई अक्षरश: झिंगाट झाली.
_ns.jpg)
कवठेमहांकाळात आर्चीसाठी तरुणाईचे झिंगाट!
कवठेमहांकाळ : अवघ्या महाराष्ट्रातील युवावर्गाला वेड लावणाऱ्या ‘सैराट’फेम आर्चीला पाहण्यासाठी कवठेमहांकाळमध्ये सोमवारी गर्दीचा ‘सैराट’ प्रयोग पाहायला मिळाला. गर्दी नियंत्रणाबाहेर जाऊ लागल्याने पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. अभिनेत्री आर्ची ऊर्फ रिंकू कार्यक्रमाच्या ठिकाणी आल्यावर ‘सैराट’वर स्वार झालेली तरुणाई अक्षरश: झिंगाट झाली.
अभिनेत्री रिंकू राजगुरूने कवठेमहांकाळमध्ये एका कापड दुकानाच्या उद्घाटनानंतर स्टेजवर येऊन चाहत्यांना हात उंचावून अभिवादन केले.