कवठेमहांकाळला शिक्षक समितीतर्फे रविवारी आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:30 IST2021-01-16T04:30:27+5:302021-01-16T04:30:27+5:30
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका आणि क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले आदर्श शिक्षक व विशेष गुणगौरव पुरस्कार तसेच शिष्यवृत्ती ...

कवठेमहांकाळला शिक्षक समितीतर्फे रविवारी आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान कार्यक्रम
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका आणि क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले आदर्श शिक्षक व विशेष गुणगौरव पुरस्कार तसेच शिष्यवृत्ती परीक्षेत यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार असा संयुक्त कार्यक्रम घेण्यात येणार असल्याचे कोळेकर यांनी सांगितले.
या कार्यक्रमाला शिक्षक समितीचे नेते विश्वनाथ मिरजकर, खासदार संजयकाका पाटील, आमदार सुमनताई पाटील, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष प्राजक्ता कोरे, शिक्षण आणि आरोग्य समितीच्या सभापती आशाताई पाटील, पंचायत समितीचे सभापती विकास हक्के, उपसभापती नीलमताई पवार उपस्थित राहणार आहेत.