केंद्राविरोधात काँग्रेसचे कवठेमहांकाळला आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:20 IST2021-05-31T04:20:23+5:302021-05-31T04:20:23+5:30
कवठेमहांकाळ : केंद्र सरकारच्या सात वर्षे सुरू असलेल्या अपयशी कारभाराबाबत रविवारी कवठेमहांकाळ येथे काँग्रेसच्यावतीने भाजपविरोधी घोषणा देत काळ्या फिती ...

केंद्राविरोधात काँग्रेसचे कवठेमहांकाळला आंदोलन
कवठेमहांकाळ : केंद्र सरकारच्या सात वर्षे सुरू असलेल्या अपयशी कारभाराबाबत रविवारी कवठेमहांकाळ येथे काँग्रेसच्यावतीने भाजपविरोधी घोषणा देत काळ्या फिती बांधून निषेध व्यक्त करण्यात आला.
शहरातील काँग्रेस कमिटीसमोर भाजप सरकारविरोधी घोषणा देण्यात आल्या. केंद्र सरकार कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला जबाबदार आहे. इंधन वाढ, वाढलेली महागाई ही केंद्र सरकारच्या अपयशाची फळे आहेत. कृषीविषयक काळे कायदे रद्द करावेत, अशी मागणी यावेळी करण्यात आली. हाताला काळ्या फिती बांधून केंद्र सरकारच्या कारभाराचा निषेध करण्यात आला.
यावेळी तालुकाध्यक्ष संजय हजारे, ज्येष्ठ नेते बाळासाहेब गुरव, प्रा. दादासाहेब ढेरे, कार्याध्यक्ष अविराजे शिंदे, युवक काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस वैभव गुरव, चंद्रकांत खरात, मुबारक मुल्ला, सुनील वाघमारे, मनोज वावरे, चैतन्य पाटील कार्यकर्ते उपस्थित होते.