कवठेमहांकाळ पोलिसांची मांडूळ तस्करांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:21 IST2021-02-05T07:21:09+5:302021-02-05T07:21:09+5:30
गजानन वसंत सरगर (२२), संजय अशोक ओलेकर (३१), तिप्पांना म्हाळाप्पा पडवळे (३३, तिघेही रा. सलगरे खुर्द), महादेव मनोहर बेनाडे ...

कवठेमहांकाळ पोलिसांची मांडूळ तस्करांवर कारवाई
गजानन वसंत सरगर (२२), संजय अशोक ओलेकर (३१), तिप्पांना म्हाळाप्पा पडवळे (३३, तिघेही रा. सलगरे खुर्द), महादेव मनोहर बेनाडे (४९), विवेक राजेंद्र बेनाडे (२८, दोघेही रा. डोनेवाडी) व इचलकरंजी येथील युवराज दत्तात्रय मगदूम अशी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत.
ही तिघेजण मांडुळ विक्री करणार असल्याची माहिती पोलीस अमीर फकीर यांना समजली. यानंतर कवठेमहांकाळ ठाण्याचे पोलीस निरीक्षक आप्पासाहेब कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल कोळंबीकर, पोलीस हवालदार दीपक गायकवाड, अमीर फकीर, मोहिते, भोसले, होमगार्ड कोष्टी यांच्या पथकाने सापळा रचून छापा टाकला. यावेळी २५ लाख रुपये किमतीच्या तीन मांडुळासह, तीन लाख रुपये किमतीची मोटार व सहा जणांना ताब्यात घेतले.
फोटो - ३१कठेमहांकाळ१