कवठेएकंदला शेकाप-भाजप युतीची बाजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:27 IST2021-01-19T04:27:58+5:302021-01-19T04:27:58+5:30
कवठेएकंद : कवठे एकंद (ता. तासगाव) ग्रामपंचायत निवडणुकीत शेतकरी कामगार पक्ष आणि भारतीय जनता पार्टीच्या ग्रामविकास पॅनेलने सत्तांतर ...

कवठेएकंदला शेकाप-भाजप युतीची बाजी
कवठेएकंद : कवठे एकंद (ता. तासगाव) ग्रामपंचायत निवडणुकीत शेतकरी कामगार पक्ष आणि भारतीय जनता पार्टीच्या ग्रामविकास पॅनेलने सत्तांतर घडवत बाजी मारली. सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचा धुव्वा उडवत १७ पैकी १३ जागांवर निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले. राष्ट्रवादी काँग्रेसला तीन तर काँग्रेस व स्वाभिमानीला एक जागा मिळाली.
अटीतटीच्या झालेल्या लढतीत मागील पाच वर्षांच्या ग्रामपंचायत कारभाराचा समाचार घेत मतदारांनी परिवर्तन घडविले.
तिरंगी झालेल्या लढतीत राष्ट्रवादी आणि भारतीय जनता पार्टी व शेकापकडून सत्तेसाठी दावा केला जात होता. मागील निवडणुकीत राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांचे १२ जागांवर वर्चस्व होते. भारतीय जनता पार्टी चार तर शेकाप एक अशी स्थिती होती. मात्र, या निवडणुकीत मतदारांनी सत्तांतर घडवत भाजप-शेकापच्या युतीला पसंती दिली.
शेतकरी कामगार पक्ष आठ व भाजपने पाच जागांवर विजय मिळविला. निकाल जाहीर होताच विजयी उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष करत गावात गुलालाची उधळण केली.
चाैकट
गड आला पण...
प्रभाग तीनमध्ये शेकापचे धडाडीचे कार्यकर्ते विनोद लगारे यांना पराभव पत्करावा लागला. यामुळे गड आला पण सिंह गेला अशी प्रतिक्रिया उमटत होती. अशोक माळी, शर्मिला घाईल, तनुजा जमादार, सुनील शिरतोडे, कविता माळी, जयश्री पाटील, केशव थोरात, रुपा थोरात, चेतन लंगडे, मिनाज मुजावर, विमल शिरोटे, दीपक जाधव, राजेंद्र शिरोटे, सुषमा बाबर, प्रणित कांबळे, चंद्रकांत नागजे, मंगल पवार हे विजयी उमेदवार ठरले.
फोटो-१८कवठेएकंद१