कवठे एकंदला क्रीडांगण स्वच्छतेसाठी युवक सरसावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:26 IST2021-04-25T04:26:28+5:302021-04-25T04:26:28+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कवठे एकंद : तासगाव तालुक्यातील सधन व प्रगतशील गाव म्हणून कवठे एकंद येथे क्रीडा क्षेत्राबाबत उदासीनता ...

Kavathe Ekandala Youth rushed to clean the stadium | कवठे एकंदला क्रीडांगण स्वच्छतेसाठी युवक सरसावले

कवठे एकंदला क्रीडांगण स्वच्छतेसाठी युवक सरसावले

लोकमत न्यूज नेटवर्क

कवठे एकंद : तासगाव तालुक्यातील सधन व प्रगतशील गाव म्हणून कवठे एकंद येथे क्रीडा क्षेत्राबाबत उदासीनता आहे. गावातील युवापिढीला खेळण्यासाठी मैदानाची उपलब्धता नाही. सार्वजनिक क्रीडांगणाची गरज ओळखून गावातील युवकांनी आरफळच्या दुर्लक्षित जागेची स्वच्छता व डागडुजी करून मैदान करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

आरोग्यासाठी व्यायाम गरजेचा आहे.

शैक्षणिक क्रीडा स्पर्धा व स्पर्धा परीक्षा, पोलीस भरती, सैन्यभरती यासाठी युवकांना

मैदान उपलब्ध नाही, ही बाब लक्षात घेऊन

येथील स्वराज्य कला, क्रीडा व सांस्कृतिक मित्र मंडळाच्या पुढाकाराने गेली आठ ते दहा वर्षांपासून आरफळ मैदान येथील परिसरातील काटेरी झाडे, गवत काढून युवकांनी श्रमदानातून स्वच्छता व जमिनीचे सपाटीकरण केले. यामुळे क्रीडांगण साकारले जात आहे.

सातत्याने स्वच्छता आणि परिसराची सफाई केल्याने क्रीडांगणाची सोय होत आहे; मात्र गेल्या काही दिवसांपासून तासगाव-सांगली रस्त्याला असणाऱ्या सार्वजनिक मैदानावर मध्यपींच्या उद्योगामुळे काचेच्या बाटल्या, प्लास्टिक, काचेचे तुकडे यामुळे परिसराला किळसवाणे करून टाकले आहे.

याची दखल घेत लॉकडाऊनच्या काळात युवकांनी परिसराची स्वच्छता व काटेरी झुडपांचे उच्चाटन करण्याचे काम हाती घेत मद्यपी विरोधात मोहीम हाती घेतली आहे.

या कामासाठी चेतन लंगडे, सचिन जाधव, बंडू गोरे, सुधीर शिरोटे ,

प्रकाश माळी,विनोद लिमकर ,जनार्दन पाटील, विद्यासागर लंगडे,भरत कोगनोळे, नीलेश पाटील आदींसह युवकांचे सहकार्य लाभत आहे.

कोट

गावातील आबालवृद्धांचा सकाळ-संध्याकाळ फिरण्यासाठी तसेच पोलीस व सैन्य भरतीचा प्रयत्न करणाऱ्या युवकांना व्यायामासाठी हक्काचा ट्रॅक बनला आहे. क्रीडांगणाच्या संरक्षणासाठी,

स्वच्छतेसाठी नागरिकांनी सहकार्य करावे.

- चेतन लंगडे अध्यक्ष स्वराज्य कला-क्रीडा मित्र मंडळ.

Web Title: Kavathe Ekandala Youth rushed to clean the stadium

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.