शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
7
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
8
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
9
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
10
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
11
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
12
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
13
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
14
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
15
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
16
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
17
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
18
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
19
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
20
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO

कवलापूर गट खुला; इच्छुकांची मांदियाळी

By admin | Updated: January 2, 2017 23:30 IST

चौरंगी लढत शक्य : अध्यक्षपदाच्या शर्यतीत अनेकजण; काँग्रेसचा बालेकिल्ला राहणार का?

सतीश पाटील ल्ल बुधगावकवलापूर (ता. मिरज) जिल्हा परिषद मतदारसंघ खुला झाला आहे. जिल्हा परिषदेचे अध्यक्षपदही याच गटासाठी असल्याने इच्छुकांमध्ये उत्साह आहे. कॉँग्रेससह भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी या प्रमुख पक्षांतील इच्छुकांची यादी वाढू लागली आहे. चौरंगी लढतीची चिन्हे आहेत.कवलापूर मतदारसंघ आजअखेर कॉँग्रेसचाच बालेकिल्ला राहिला आहे. कॉँग्रेस पक्ष विशेषत: वसंतदादा घराणे आणि त्यात पुन्हा मदन पाटील यांना मानणारा मोठा वर्ग आहे. केवळ २००२ मध्ये झालेली निवडणूक याला अपवाद ठरली आहे. २००२ मध्ये येथून छायाताई पाटील राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडून आल्या होत्या. याचे कारण त्यावेळी त्यांचे तत्कालीन नेते मदन पाटील हेच राष्ट्रवादीत होते. मागीलवेळी इतर मागास प्रवर्गातील महिलांसाठी राखीव झालेल्या या मतदारसंघात कवलापूरसह बामणोली, सावळी, बिसूर, खोतवाडी आणि वाजेगाव या गावांचा समावेश होता. कॉँग्रेसच्या पवित्रा बरगाले निवडून आल्या होत्या. सांगली आणि मिरज अशा दोन विधानसभा क्षेत्रातील गावांचा समावेश हे या गटाचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. यामुळे येथे दोन्ही आमदारांचे लक्ष असते.बिसूर, खोतवाडी आणि वाजेगाव या सांगली विधानसभा क्षेत्रातील गावांपैकी आगामी निवडणुकीसाठी केवळ बिसूरच कवलापूर गटात समाविष्ट आहे. खोतवाडी, वाजेगावऐवजी आता मिरज विधानसभा क्षेत्रातील कानडवाडीचा नव्याने समावेश करण्यात आला आहे.कवलापूर गटांतर्गत येणाऱ्या बिसूर पंचायत समिती गणात मागीलवेळी भाजपच्या सतीश निळकंठ यांना तत्कालीन आमदार संभाजी पवार यांनी निवडून आणले होते. मात्र कवलापूर पंचायत समिती गणात भाजपचा उमेदवार निवडून आणण्यात आ. सुरेश खाडे यांना अपयश आले होते. येथून कॉँग्रेसच्या तेजश्री चिंचकर निवडून आल्या होत्या.मागीलवेळी बिसूर गणातून भाजपच्या चिन्हावर निवडून आलेले सतीश निळकंठ सध्या पृथ्वीराज पवारांसोबत शिवसेनेत आहेत. निळकंठ यांनी क्रियाशील आणि अभ्यासू पंचायत समिती सदस्य म्हणून ओळख निर्माण केली आहे. कवलापूर गटात शिवसेनेकडून त्यांची उमेदवारी निश्चित मानली जाते. बुधगाव मतदारसंघातून मागील दोन ‘टर्म’ काँग्रेसकडून प्रतिनिधीत्व करणारे शिवाजी डोंगरे हे कवलापूर मतदारसंघातून भाजपकडून निवडणूक लढविण्यास सज्ज झाले आहेत. खा. संजय पाटील आणि आ. सुधीर गाडगीळ यांचे ते निकटवर्तीय आहेत. निवडणुकीची गणिते नेमकेपणाने समजणारा सदस्य अशी त्यांची ओळख आहे. यामुळे भाजपच्या उमेदवारीसाठी ते प्रबळ दावेदार आहेत.कॉँग्रेसकडून कवलापुरातील ज्येष्ठ नेते निवासबापू पाटील यांनी आरक्षण जाहीर झाल्यापासून मोर्चेबांधणी सुरू केली आहे. ग्रामपंचायतीत कॉँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सत्तारूढ आहे. सोसायटी, वसंत आणि श्री सिद्धेश्वर पाणीपुरवठा संस्था, दूध संस्थांचे ते नेतृत्व करतात. वसंतदादा कारखान्यात ते संचालक होते. कॉँग्रेसकडून येथे सांगली बाजार समितीचे माजी सभापती सुभाष खोतही इच्छुक आहेत. खोतवाडीचे उद्योजक नंदू पाटील, शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष अशोक माने यांची नावेही चर्चेत आहेत.पूर्वीच्या जनता दलाचे नेते स्व. किसनराव ऊर्फ के. डी. पाटील यांना मानणाराही गट येथे आहे. त्यांचे पुत्र तंटामुक्त समितीचे अध्यक्ष भानुदास पाटील राष्ट्रवादीत आहेत. आ. जयंत पाटील यांनी त्यांना येथून उतरवण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. तेही ग्रामपंचायतीच्या आघाडीसह संस्थांचे नेतृत्व करतात.भाजपकडून विद्यमान ग्रामपंचायत सदस्य बजरंग ऊर्फ विजय पाटील यांना तयारी करण्यास आ. खाडे यांनी सांगितले आहे. तेही काही संस्थांमध्ये कार्यरत असतात. बिसूर गण ओबीसी महिला गटासाठी राखीव आहे. येथे कॉँग्रेसकडून बिसूरच्या पूनम कोळी आणि सुवर्णा कोळी इच्छुक आहेत. भाजप, राष्ट्रवादीच्या उमेदवारांची नावे अद्यापही पुढे येत नाहीत. शिवसेनेकडून निळकंठ यांच्या कुटुंबातील कोणीतरी असू शकते. कवलापूर गण खुला आहे. मिरज कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अण्णासाहेब कोरे यांचे पुतणे सतीश कोरे कॉँग्रेसकडून, तर शिवसेनेकडून बामणोलीचे माजी सरपंच सावळाराम शिंदकर इच्छुक आहेत.डबल आॅफर!भाजपच्या एका गटाकडून पूर्वाश्रमीचे भाजपचे आणि सध्या शिवसेनेत असणारे सतीश नीळकंठ यांना आॅफर मिळाल्याचे समजते. एकीकडे शिवसेनेच्या उमेदवारीचा भरवसा आणि दुसरीकडे भाजपची आॅफर अशा कात्रीत नीळकंठ सापडले आहेत. ते स्थानिक पातळीवर सेना-भाजपच्या युतीसाठी प्रयत्न करणार असल्याचे समजते.लक्षवेधी त्रिमूर्ती!कवलापुरातील कॉँग्रेसचे निवासबापू पाटील, राष्ट्रवादीचे भानुदास पाटील आणि भाजपचे बजरंग पाटील एकमेकांसमोर उभे ठाकणार काय? कोण कोणासोबत छुपी युती करणार, हे सध्या तरी समजणे अवघड आहे. निवासबापू पाटील यांची उमेदवारी निश्चित आहे. भानुदास पाटील, बजरंग पाटील यांच्याच भूमिकेकडे सर्वांचे लक्ष आहे.