राष्ट्रीय क्रीडा पुरस्काराने कवलापूरचे बहीण-भाऊ सन्मानित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:31 IST2021-09-04T04:31:27+5:302021-09-04T04:31:27+5:30
मिरज : बुधगाव (ता. मिरज) येथील वसंतदादा पाटील इंग्लिश स्कूलमधील वेदांत प्रशांत पवार व वैभवी प्रशांत पवार या कवलापूर ...

राष्ट्रीय क्रीडा पुरस्काराने कवलापूरचे बहीण-भाऊ सन्मानित
मिरज : बुधगाव (ता. मिरज) येथील वसंतदादा पाटील इंग्लिश स्कूलमधील वेदांत प्रशांत पवार व वैभवी प्रशांत पवार या कवलापूर येथील भावंडांनी क्रीडा क्षेत्रात चांगली कामगिरी केली आहे. याबद्दल मेजर ध्यानचंद केंद्रीय क्रीडा परिषदेतर्फे भारत भूषण सुवर्णलक्ष राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार व राष्ट्रीय तायक्वांदो पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
वेदांत पवार याने बालेवाडी (पुणे) येथे कराटेमध्ये ब्लॅक बेल्ट मिळवून कराटे स्पर्धेत जिल्हा सुवर्ण, राष्ट्रीय स्पर्धेत ज्युदोचे सुवर्णपदक व युनिफाईटचे सुवर्णपदक मिळविले. रत्नागिरी जिल्ह्यात लांबउडीत प्रथम क्रमांक व ॲथलेटिक्समध्ये शासनाची शिष्यवृत्ती मिळविली. गोव्यात राष्ट्रीय कराटे स्पर्धेत राैप्यपदक मिळविले. सातवीत शिकणाऱ्या वैभवी हिने थायलंड येथे आंतरराष्ट्रीय स्पर्धेत चॅम्पियनपद व राष्ट्रीय स्पर्धेत (चेन्नई) व्दितीय क्रमांक, राज्यस्तरीय सुपर चॅम्पियनशीप व दुबईतील स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविला. तसेच कराटे ब्लॅक बेल्ट धारण करून कराटे स्पर्धेत जिल्हा सुवर्णपदक मिळविले. भोपाळ येथे लेग बाॅल स्पर्धेत सुवर्ण, दिल्लीत ज्युदो स्पर्धेत राैप्य मिळविले. युनिफाईट स्पर्धेत सुवर्णपदक व गोव्यात कराटे स्पर्धेत कांस्य व राष्ट्रीय कराटे स्पर्धेत सुवर्णपदक मिळविले. बीडीएस वक्तृत्व व मेमरी स्पर्धेत तिने राैप्यपदक मिळविले आहे. दोन्ही भावंडांना त्यांचे आई-वडील व प्रशिक्षकांनी मार्गदर्शन केले.